शनिवार, २५ एप्रिल, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-१

हिंदू मान्यता काला नुसार बदलतात असे इतर धर्मात होत नाही. त्यामुळे आजचा हिंदू धर्म शंभर वर्षापूर्वीच्या हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे कारण ताे नित्य बदलणारा आहे. तसें इतर धर्मात (विषेश करून इस्लाम व ख्रिस्त) आढळून येत नाही कारण ते जड म्हणजे न बदलणारे आहेत. हिंदू धर्म एकाद्या वडाच्या झाडा सारखा आहे. इतर धर्म पुतळ्यासारखे आहेत. वडाचे झाड पांच हजार वर्षाचे असले तरी त्याची सर्व पाने, फांद्या नवीन असतात. पुतळा जर पांच हजार वर्षाचा असेल तर त्याचे सर्व भाग तेवढेच जुने असतात. पुतळा मोडला तर तो दुरूस्त होत नाही, वडाची फांदी मोडली तर तेथे नवीन फांदी येत असते. असा महत्वाचा फरक इतर धर्मात व हिंदू धर्मात आहे.
मनुस्मृतीतील आदेश कालमानानुसार बदलता येतात. बाराव्या भागात त्याबद्दल दिले आहे ते नंतर आपण पहाणार आहोत. दुर्दैवाने ते न केल्यामुळे आजचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ह्या बद्दलची चर्चा आपण योग्य वेळी करणार आहोत. मनुस्मृतीत बरेच विचार परस्पर विरोधी असल्याचे आढळते. म्हणून असा एक मत प्रवाह आहे किं मूळ पुस्तकात नंतर घुसडखोरी (interpolations)झाली असावी. त्याची चर्चा यथावकाश आपण करणार आहोत.
मनुस्मृतीचा अभ्यास करण्या आधी हिंदू मान्यतेचे जे तीन भाग आहेत ते समजून घेणे आवश्यक असते. ते असे, सनातन धर्म, ब्राह्मण धर्म आणि हिंदू परंपरा अथवा सध्याचा हिंदू धर्म. हल्ली ह्यात बराच गोंधळ केला जातो म्हणून ह्याची चर्चा होणे अगत्याचे होते. तरीसुद्धा त्या गोंधळातून आपल्याला मार्ग काढावा लागेल. सनातन धर्म म्हणजे वेदाची परंपरा असलेला. त्यात, नंतर उत्पन्न झालेल्या जैन धर्माच्या प्रभावातून, ब्राह्मण धर्म उत्पन्न झाला. मनुस्मृती मुख्यत्वे करून, ह्या ब्राह्मण धर्माचा विचार सांगणारा आहे. ह्यातील सनातन व ब्राह्मण धर्म जड म्हणजे न बदलणारे आहेत परंतु, सध्याचा हिंदू धर्म नित्य बदलणारा असा आहे. हल्ली काही संघटना ब्राह्मण धर्माचा प्रचार हिंदू धर्म म्हणून करताना दिसतात. प्रचलित हिंदू धर्म जड करण्याचा प्रयत्न हाेताना दिसते. अभ्यासकांनी ह्याचा योग्य अंदाज घेऊन मनुस्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. काहींच्या मते हिंदू धर्म नसून ती एक संस्कृती आहे. म्हणून त्याची तुलना इतर धर्मांशी करणे अयोग्य ठरते. मी सुद्धा हिंदू धर्म न म्हणता हिंदू मान्यता असा ‌उल्लेख केला आहे. आपण ह्या सर्व गाेष्टी यथावकाश पहाणार आहाेत.
पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

सुरुवात


ह्या ब्लॉगमध्ये मी दोन विषयांवर लिहीण्याचे ठरवले आहे

पहिला मनुस्मृतीची चर्चा करावयाची आणि त्यानंतर इतर चालु विषयांवर लिहीणार आहे
मनुस्मृती इ.पूर्व १५०० वर्षे लिहीला गेला असावा असे वाटते. 
मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्थेला फार महत्व असल्याचे दिसून येते. 
विषेश म्हणजे ही वर्ण व्यवस्था जन्मावर अवलंबून आहे. 
त्या उलट महाभारतात आणि त्या आधीच्या काळात ही गुणकर्मावर अवलंबून असल्याचे दिसून येते. 
ह्याचा अर्थ, मनुस्मृती सनातन धर्माचा भाग नाही हे स्पष्ट होते. 
कारण, सनातन धर्मात वर्ण व्यवस्था गुणकर्मावर अवलंबून होती. 
म्हणजे मनुस्मृती त्या नंतरच्या काळातील म्हणजे ब्राह्मण काळातील आहे. 
म्हणून हे पुस्तक ब्राह्मण धर्माचे आहे असे समजावे लागेल. 
मनुस्मृती वाचताना त्याचा सतत अनुभव येतो.

पुढील पोस्ट पासून मी मनुस्मृती वाचण्यास सुरुवात करणार आहे. 
मनुस्मृतीमध्ये बारा अध्याय आहेत. त्यातील माहिती नुसार स्त्री, शुद्र आणि ब्राह्मण ह्यांचे संबंध समाजात कसे असावेत ते दिसून येते
इतर वर्णांना फारसे महत्व नाही. 
त्यातील श्लोकांवर भाष्य करणार आहे म्हणजे हल्लीच्या काळाच्या संदर्भात त्यांचा अर्थ समजणे सोपे होईल. 
मला आशा आहे ह्याचा उपयोग माझ्या वाचकांना होईल.  
आता आपण दहा दिवसानंतर भेटू या.

जर कोणा वाचकास मनुस्मृतीचे मराठी भाषांतर हवे असेल तर त्याने खाली दिलेल्या इमेल वर विनंती पाठवावी. 
ashokkothare@gmail.com/