सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा- १३

देवांचे प्रसाद कसे ठरतात
शाक्त प्रणालीनुसार देवांचे प्रसाद त्या दैवताच्या वाहनावरून ठरतात. त्या वाहनाचे खाद्य ताेच त्या दैवताचा प्रसाद असे समजले जाते. वैदिक प्रणालीनुसार तसे नाही.
तेथे सरसकट सर्व देवांचे प्रसाद शाकाहारी असतात.
उदाहरणार्थ, अंबेचे वाहन सिंह म्हणून तिचा प्रसाद मांसाचा असावा लागताे. ह्याचा अर्थ तिच्या सर्व रुपांचा प्रसाद सुद्धा मांसाचाच असावा लागताे. त्यात चंडीका, कालिका, जीवदानी, अंबेजाेगाई, तुळजाभवानी, एकवीरा, काळुबाई, हरबाई-नारबाई इत्यादी सर्व देवींसाठी मांसाचा प्रसाद द्यावयाचा असताे.
काही देवींचे वाहन वाघ असते, त्यांचा प्रसाद सुद्धा मांसाचाच असावा लागताे.
विष्णूचे वाहन गरूड म्हणजे मांसाहारी पक्षी, म्हणून प्रसाद मांसाचा द्यावा लागताे.
विष्णूची अनेक रुपे जसें कृष्ण, राम, परशुराम, बुद्ध, येशु इत्यादी ह्यांसाठी सुद्धा मांसाचा प्रसाद द्यावयाचा असताे.
गणपतिचे वाहन मुषक म्हणून सर्व प्रसाद लहान स्वरूपात म्हणजे, चुरमा, साखरचणे, बुंदी, बतासे, असा शाकाहारी जर मांसाहारी द्यावयाचा असेल तर, खीमा, अंड्याचा कुरमा, असे द्यावे लागतात. कारण उंदीर हा मिश्राहारी प्राणी अाहे. काही लाेक माेठा लाडू प्रसाद म्हणून देतात ते चुकीचे अाहे.
वाहन ताे प्रसाद सहजपणे खाऊ शकला पाहिजे अशी संकल्पना असते.
देवी सरस्वतीचे वाहन माेर असते ताे पक्षी मिश्राहारी म्हणून तिचा प्रसाद फळे, धान्ये, मांस व मांसें असा असावा.
देवी लक्ष्मीचे वाहन राजहंस म्हणून तिचा प्रसाद मांसळीचा असणे अावश्यक ठरते.
शनिचे वाहन कबुतर जाे शाकाहारी पक्षी अाहे म्हणून त्याचा प्रसाद शाकाहारी असावा लागेल.
महादेव अर्थात, शंकर ह्यांचे वाहन नंदी जाे शाकाहारी म्हणून त्याचा प्रसाद शाकाहारी असावा.
यमाचे वाहन रेडा म्हणून त्याचा प्रसाद शाकाहारी असावा.
काेकणात यक्षिणींची पुजा माेठ्याप्रमाणात हाेते, यक्षिणींचा अाहार मिश्र म्हणून भाज्या, फळे व मांसाचा असावा.
कुबेराचा प्रसाद दाेनही प्रकारचा करता येताे.
गणपति व कुबेर ही एकाच शक्तीची दाेन रुपे अाहेत म्हणून त्याप्रमाणे प्रसादाचे स्वरूप ठेवतां येईल.
काही दैवतांची वाहने दाखवली जात नाहीत. अशा दैवतांचा प्रसाद भक्त त्याच्या पसंतीने ठरवू शकताे. जसें पांडुरंग, हनुमान, दत्त इत्यादी. तसे पाहिले तर खरे शाक्त पंथी लाेक वाहन नसलेल्या दैवतांची अाराधना करीत नाहीत. शाक्त पंथ क्षत्रियांचा असताे त्यात ब्राह्मण येत नाहीत. प्रामुख्याने ते देवी पुजक असतात.
ह्यामागील संकल्पना अशी अाहे किं, देवतेला तिचे वाहन अतिप्रिय असते, म्हणून त्याला जे खाद्य प्रिय ते तिला प्रिय असे समजले जाते; ताेच पदार्थ प्रसाद म्हणून देणे श्रेयस्कर ठरते. उदाहरणार्थ, वाघाला अथवा सिंहाला जर पुरणपाेळी दिली तर ताे ती खाणार नाही म्हणून असा प्रसाद देण्यात तथ्य रहात नाही.
देवतेचा भक्त तिचे मुख समजले अाहे. म्हणून भक्ताने, देवतेला दिलेला, प्रसाद ग्रहण करणे बंधनकारक असते. सर्व शाक्त उपासक त्यामुळे मांसाहारी असतात. ब्राह्मण ज्या पद्धतीने शक्तिची पुजा करतात तिला शाक्तपंथात मान्यता नाही. खरे ब्रह्मण शक्तिपुजक नसतात. अाज खरे वैदिक ब्रह्मण उरलेले नाहीत असे खेदाने मान्य करावे लागते.
खर्या वैदिक ब्रह्मणांना देवीची पुजा करणे शास्त्र संमत नाही हे बर्याच मंडळींना माहीत नाही.

पुढील पोस्ट मध्ये वेदनाविरहीत बळी कसा द्यावयाचा ते पहाणार अाहाेत -
मनुस्मृती पुढे चालू - भाग दुसरा -
वेदाने दिलेल्या पवित्र कर्मकांडानी, द्विजांनी अापले विधी करावेत ज्यामुळे त्यांचे शरीर पवित्र हाेईल व मृत्युनंतर सद्गती मिळेल. २६
द्विजांनी शुद्धिकरणांसाठी मातेच्या गर्भधारणेच्या काळात हवन करुन गटकर्म करावे लागते. त्यानंतर बटूचे मुंडण व माैजीबंधन त्याच्या माता व पित्यांनी करावयाचे असते. २७
ब्रह्मात विलीन हाेण्यासाठी वेदाचा अभ्यास व नित्य वाचन करणे, हवन करून पितर व ऋषी ह्यांना प्रसन्न करणे, तीन पवित्र शास्त्रांचा अभ्यास करणे, पुत्राला जन्म देणे, दान करणे, अशा सर्व गाेष्टी कराव्या लागतात. २८
अर्भकाची नाळ कापण्या अाधी गटकर्म विधी मुलगा असेल तर करावी लागतात. त्यासमयी पवित्र मंत्रांचे पठण हाेत असतांना बालकाला सुवर्ण, मध व लाेणी भरवावे. (चाटण द्यावे) २९
नवजात बालकाच्या पित्याने बालकाच्या जन्मानंतर दहाव्या अथवा बाराव्या दिवशी नामकरण विधी करावा. अथवा इतर शुभ दिवशी (मुहूर्तावर) नामकरण विधी उरकावा. ३०
नामकरण करतांना काही गाेष्टी जसे, ब्राह्मण असेल तर नांवातील पहिला भागात एकाद्या पवित्र गाेष्टीचा उल्लेख असावा. क्षत्रिय असेल तर नांवात तेज व सामर्थ्य असावे, वैश्य असेल तर वैभवाचा उल्लेख असावा. परंतु शुद्र असेल तर त्याच्या नांवात तुच्छता व्यक्त झाली पाहिजे. ३१
ब्राह्मणाच्या नावातील दुसरा भाग आनंद व्यक्त करणारा असावा, क्षत्रिय असेल तर दुसर्या भागात रक्षक असल्याचा उल्लेख असावा, वैश्याच्या नांवात उत्कर्षाचा उल्लेख झाला पाहिजे. शुद्र असेल तर सेवा भाव व्यक्त झाला पाहिजे. ३२
बालक स्त्री असेल तर तिच्या नांवात सहजपणा असला पाहिजे. उच्चाराला साेपे असले पाहिजे, दाेन अथवा तीन पेक्षा जास्त अक्षरे नसलेले असावे. नांवातील शेवटचे अक्षर स्वर असावा व ताे दीर्घ असला पाहिजे. नांवातून प्रसंन्नता, साेज्वलता, प्रेम व्यक्त झाली पाहिजे. ३३
जन्मानंतर चाैथ्या महिन्यात निष्क्रमण विधी (घरातून बाहेर फिरावयास काढणे) करावा, सहाव्या महिन्याला अन्नप्रशन विधी (जेवण, भात वरण असे, देणे) करावा, त्यानंतर इतर विधी कुटूंबाच्या रितिरीवाजा नुसार करावेत. ३४
वेदात दिलेल्या माहितीनुसार सर्व द्विजांनी आध्यात्मिक प्रगतीसाठी मुंडण बालकाच्या पहिल्या अथवा तिसर्या वर्षी करावे. ३५
ब्राह्मण बालकाचा उपनयन विधी त्याच्या आठव्या वर्षी, क्षत्रिय बालकाचा दहाव्या व वैश्य बालकाचा बाराव्या वर्षी करावा. ३६
ज्या ब्राह्मणाला पाैराेहित्य विशारद व्हावयाचे आहे त्याची तयारी बालकाच्या पांचव्या वयापासून करावी, क्षत्रियास राज्य कारभार पहावयाचा असताे म्हणून त्याची तयारी सहाव्या वर्षापासून करावी, वैश्याची तयारी आठव्या वयापासून करावी. परंतु, ह्याबद्दलचे निर्णय बालकाच्या मातापित्यांनी अथवा पालकांनी घ्यावयाचे असतात. ३७
ब्राह्मणाच्या अधिकारासाठी त्याला सावित्री विधी करावा लागताे. त्यासाठी वयाेमर्यादा साेळा वर्षे आहे. क्षत्रियांस एकविसावे व वैश्यास चाेविसावे वय सांगितले आहे. ३८
जर ह्या तीन वर्णातील बालकांनी दिलेल्या वयात शिक्षणांस सुरुवात नाही केली तर त्याला व्रात्य समजले (अनार्य) जावे, अशा परिस्थितीत त्याला सावित्री विधी करण्याचा रहाणार नाही. ३९
अशा व्रात्य इसमाशी ब्राह्मणांनी काेणत्याही प्रकारचा संबंध ठेवावयाचा नसताे. ४०
ह्या प्रत्येक वर्णातील विद्यार्थ्यानी अंगात वरील व खालील अशी काेणती वस्त्रे नेसावीत ते पहा, ब्राह्मणांने वरील वस्त्र काळ्या काळविटाच्या चामड्याचे घालावे. क्षत्रियाने ठिबके असलेल्या हरणाचे चामडीचे वस्त्र नेसावे, वैश्याने बकर्याच्या चामडीचे वस्त्र नेसावे. सर्वांनी खालील वस्त्र मात्र लाेकर, ताग अथवा कापसाचे असावे. ४१
कमरपट्टा ब्राह्मणाने मुंग गवताच्या वाखापासून केलेला वापरावा. क्षत्रियाने मूर्व गवताच्या वाखाचा वापरावा; हे मूर्व गवताचे वाख धनुष्याच्या ताणासाठी वापरतात. वैश्याने तागाचा वाख वाख वापरावयाचा असताे. ४२
जर मुंग गवत उपलब्ध नसेल तर कुश (दुर्वाच्या जातिचे गवत), अस्मंतक अथवा बाल्बाग गवताचा वाख वापरता येईल. त्यांचे तीन पदर व तीन गाठी असाव्यात. त्यात कुटूंबाच्या विशिष्ट रितीनुसार बदल करण्यास हरकत नसते. ४३
ब्राह्मणाचे यज्ञाेपवित (जान्हवे) कापसाच्या तंतूंपासून बनवलेले असावे. क्षत्रियाचे तागाचे व वैश्याचे लाेकरीचे असावे. ४४
पवित्र नियमांच्या आदेशानुसार ब्राह्मणांनी जाे दंड वापरावयाचा ताे बिल्व, पळस ह्यांचा असला पाहिजे, क्षत्रिय स्नातक (विद्यार्थी) वेत अथवा खदिर वृक्षाचा आणि वैश्य पिलू किंवा अाैदुंबराचा वापरतील. ४५
ब्रह्मणांने धारण करावयाचा दंड त्याच्या उंचीचा असावा, क्षत्रियाचा त्याच्या कपाळा पर्यंत पाेहाेचेल असा असावा. वैश्याचा त्याच्या नाकापर्यंत पाेहाेचेल इतका असावा. ४६
हे दंड दिसण्यास सुबक, गुळगुळीत, काेणताही इतर दाेष (खडबडीत, कांटे असलेले, जळलेले, वाकडे तिकडे आकार वगैरे) नसलेले असे असावेत. ४७
दरराेज भिक्षा मागण्या आधी स्नातक सूर्यदेवाची पुजा करून, पवित्र अग्निस प्रदक्षिणा करून उजव्या हाताने, घालून दिलेल्या नियमांनुसार, भीक मागण्यास सुरवात करेल. ४८

येथे द्विज शब्द वापरला आहे तिनही वर्णांसाठी. ह्याचा फायदा घेऊन पुढील काळात जसे ब्राह्मणांचे प्राबल्य वाढले तसें काही क्षत्रिय व वैश्यानी स्वत:ला ब्राह्मण म्हणून सांगण्यास सुरुवात केली. त्यात नमुद करण्यासारखी उदाहरणे अशी,
चित्तपावन अर्थात् काेकणस्थ ब्राह्मण जे मुळचे परशुराम क्षत्रिय आहेत ते येतात. शेणवी ब्राह्मण जे मुळचे वैश्य आहेत ते येतात जे आज स्वताला गाैड सारस्वत ब्राह्मण म्हणून सांगतात. त्याशिवाय इतर वैश्य जाती ज्यांनी स्वताला ब्राह्मण सांगण्यास सुरुवात केली ते आहेत, देवज्ञ ब्राह्मण, कुडाळदेशकर (साेनार). हि झाली महाराष्ट्रातील, बाकी भारतात इतर बरीच उदाहरणे आहेत.

मनुस्मृती भाग दुसरा पुढील पोस्ट मध्ये चालू -

माझा इमेल ashokkothare@gmail.com