गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

मनुस्मृती व गप्पा

जैन लाेक त्यांचे तत्वज्ञान3
मागील पाेस्ट वरून चालू -
शाकाहाराचे विनाकारण महत्व वाढवलेले आहे. कोणी काय खावे खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आवडी निवडीचा विषय आहे तरी हे जैन लोक शाकाहाराचे धर्माच्या नांवांने अवडंबर माजवत आहेत. ह्यात विशेष म्हणजे हे जैन लोक स्वता खात नाहीत इतरांनीसुद्धा खाऊ नये असा आग्रह धरतात. मला मिळालेल्या माहिती नुसार १९९५ साली जाे गाे हत्त्या बंदीचा कायदा मंजूर झाला ताेसुद्धा जैन लाेकांनी आमदारांना पैसे देऊन मंजूर करून घेतला हाेता. अपरिग्रह नियमाचे पालन करता जमा केलेली संपत्ति वापरून ते लाेक इतरांना सुद्धा मांसाहार करण्यास विराेध करतात असे दिसते. असे करून हे लाेक आपण फार माेठे अहिंसक असल्याचा देखावा करीत असतात. पुढील चर्चेत मांसाहारा मागील नैतिक मुल्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ह्या ठिकाणी प्राण्याला मारण्याच्या क्रियेवर थोडी चर्चा करणे आवश्यक ठरते. जन्मणारा प्रत्येक प्राणी मरणारच, कोणीही अमर नाही. प्राण्याच्या मरणाची कारणे काय असतात ते पहावे लागेल. वृद्धत्वामुळे शरीर अपंग झाल्यामुळे मरण येते, रोग झाल्यामुळे, अपघातामुळे, हत्येमुळे जसे खून, शिकार; उपासमारी, आत्महत्या, विषबाधा केल्यामुळे अशा विविध कारणांनी मरण ओढवत असते.
किती प्रकारे मृत प्राण्याच्या शरीराची विल्हेवाट लागते ते पाहूया. अशारीतीने मेलेल्या प्राण्याच्या शरीराचे काय होते ते पहावे लागेल. ते शरीर कुजून मातीत मिळून जाते, असे झाले तर असंख्य रोगकारक सुक्ष्म जिवाणू उत्पन्न होतात त्यामुळे सर्वत्र रोगांचा प्रसार होऊ शकतो. प्राणी मारला जातो त्याला इतर प्राणी खातात. अशारितीने जर ते शरीर खाल्ले गेले तर त्यामुळे कोणताही धोका नसतो. जर शरीर जाळले गेले तर कोणताही धोका होत नसला तरी त्यामुळे त्या प्राण्याचे शरीर व्यर्थ जात असते. प्राण्याचे शरीर अशारितीने नष्ट होणे निसर्गाच्या, जीवो जीवस्य जीवनम्, ह्या तत्वाच्या विरुद्ध असते. म्हणून प्राणी खाल्ला जाणे हेच जास्त श्रेयस्कर ठरते.
आता, मनुस्मृतीचा दुसरा भाग श्र्लाेक १४१ – १६६ वाचू या.
जाे ब्राह्मण पाेटासाठी वेद वेदांगे शिकवताे त्यास उपाध्यय म्हणतात. १४१
जाे ब्राह्मण गर्भाधन विधी करताे आणि त्यानंतरचे इतर विधी वेदात सांगितल्यानुसार यथाेचितपणे करताे त्याला त्या मुलाचा गुरू समजावे. १४२
जाे ब्राह्मण आग्नेध्येय, पकयज्ञ, आणि श्राैत विधी जसें, अग्नीस्ताेम (दुसर्यासाठी) करताे त्याला त्या माणसाचा पुराेहित समजावे. १४३
जाे बाप बटूला वेद सांगेल ताे त्याचा मायबाप असे समजावे. त्याचा कधीही त्यानी अपमान करतां नये. १४४
आचार्य उपाध्यायापेक्षा दसपट श्रेष्ठ असताे, पिता अाचार्यापेक्षा शंभरपट श्रेष्ठ असताे, माता (जन्मदात्री) पित्यापेक्षा हजारपट श्रेष्ठ असते. १४५
जन्मदात्या पित्यापेक्षा वेदाचे ज्ञान शिकवणारा जास्त पुज्य असताे. कारण, वेदाचे ज्ञान ह्या जन्माबराेबर नंतरच्या जन्मातसुद्धा उपयाेगाचे असते. १४६
जेव्हां माता पित्याच्या परस्पर प्रेमातून त्याचा मातेच्या गर्भातून जन्म हाेताे तेव्हां ताे केवळ पशु असताे. परंतु, वेदांचे ज्ञान देणारा खरा पिता असताे कारण, त्यामुळे ताे मनुष्य हाेताे. म्हणून वेदांचे ज्ञान देणार्याचा मान त्याच्या पित्यापेक्षा जास्त असताे. १४७
वेदातील पवित्र ज्ञान सावित्री मंत्र ह्यांच्या ज्ञानामुळे असा माणूस मृत्यु म्हातारपण ह्यांपासून मुक्त हाेताे. १४८
विद्यार्थ्याने हे नेहमी लक्षात ठेवावे किं, जाे इसम त्याला वेदाचे जे काही ज्ञान देताे ताे त्याचा गुरू आहे. १४९
जाे वेदाचे ज्ञान देताे ताे जरी वयांने लहान असला तरी ज्ञानांने ताे वडील असल्याने त्याला त्याने वडील समजावे. १५०
लहान वयांत कवी (एक ऋषी) अंगिरसाचा मुलगा, वयाने लहान हाेता परंतु, इतरांपेक्षा ज्ञानाने माेठा हाेता म्हणून त्याला त्याच्या पेक्षा वयाने माेठे असलेल्या इतरांना "अहाे मुलांनाे", असे बाेलण्याचा हक्क प्राप्त झाला हाेता. १५१
अशा रितीने त्या वयाने माेठ्या असलेल्या लाेकांनी देवांकडे त्या बद्दल तक्रार केली तेव्हां देवांनी सांगितले किं, ताे बराेबर आहे; कारण, ज्ञानाने माेठा ताे खरा वडील असताे हे लक्षात घ्यावें. १५२
ह्याकरता, वेदाचे ज्ञान असलेल्या लाेकांना वडील समजवे ते ज्ञान नसलेल्या लाेकांना बालकं समजावे. १५३
ऋषी सांगतात, खरे वडीलपण वयाने, केस पाढरे झाल्याने, पैशाने अथवा वशिल्याने प्राप्त हाेत नाही तर केवळ वेदाच्या त्यातील अंगांच्या (उपनिषद इत्यादि) ज्ञानानेच प्राप्त हाेत असते. १५४
ज्येष्ठत्व ब्राह्मणांसाठी वेदाच्या ज्ञानांने ठरते, क्षत्रियांचे त्याच्या शाैर्याने ठरते, वैश्याचे त्याच्या संपत्तिने ठरते शुद्राचे त्याच्या वयांने ठरते. १५५
केवळ केस पांढरे झाले म्हणून काेणीही वडील हाेत नाही, तर त्याच्या वर्णानुसार त्याच्या गाेष्टी असतील तरच त्याचे ज्येष्ठत्व सिद्ध हाेत असते. १५६
लाकडाची हत्तीची मूर्ति अथवा, चामड्याचे काळवीट हे केवळ नांवापूरते असतात, त्यात तथ्यांश नसताे. तसेंच वेदाचे ज्ञान नसलेला ब्राह्मण तसांच नांवापूरतांच ब्राह्मण ठरताे. १५७
ज्या ब्राह्मणाला वेदातील ऋचा माहीत नाहीत ताे ब्राह्मण व्यर्थ असताे जसें, नपुसकाला स्त्रीपासून बालकाला जन्म देतां येत नाही भाखड गाईला गाभण हाेता येत नाही. १५८
जन्मणार्या प्रत्येक जीवांस त्याचे कर्तव्य माहित असावे लागते म्हणून त्याचे ज्ञान घ्यावे लागते ते ज्ञान शिक्षकांनी माेठ्या प्रेमाने विद्यार्थ्याला द्यावयाचे असते. १५९
खराेखरच, माेठ्या सावधगिरीने विचार करणारा वर्तन ठेवणार्यास वेदांतामुळे (उपनिषद) फायदा हाेताे. १६०
शिकवतांना विद्यार्थ्यास भिती वाटेल, राग येईल, वेदना हाेतील, काेठल्याही प्रकारे त्रास हाेईल असे शिक्षकांने केल्यास त्या शिक्षकांस स्वर्गाची दारे बंद हाेतात. (विद्यार्थ्याचा आत्मविश्र्वास जिंकून त्याला ज्ञान द्यावे.)१६१
शिक्षकांने खाेट्या स्तुती पासून दूर रहावे टीका करणार्यास जवळ ठेवावे, त्यामुळे ताे सुधारत रहाताे. १६२
ज्याची टीका हाेते अथवा ज्याचा (विनाकारण) तिरस्कार केला जाताे ताे सुखांने झाेपताे आरामशीर उठताे, निर्धास्तपणे वावरताे परंतु, टीका, निंदानालास्ती करणारे कालाच्या आेघात नष्ट हाेतात. १६३
ताे द्विज शिक्षक म्हणून कामाला लावलेला, आपले काम त्या बराेबर आवश्यक असलेले विधी जे वेदांत दिले आहेत, यथासांग पार पाडेल, १६४
आर्य, (विद्यार्थी) वेदाचा अभ्यास त्या बराेबर आवश्यक रहस्य शिकेल, त्यासाठी वेदातील दिलेले कठाेर नियम पाळेल, १६५
जाे ब्राह्मण वेदात दिलेले कठाेर व्रत करताे, ताे वेदाचे वाचन नियमितपणे करेल, कारण, वेदाचे अध्ययन करणे हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य असते. १६६
पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.