गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

नथुराम गाेडसेने ब्राह्मण समाजाचे कसे कल्याण केले?

नथुराम गाेडसे नांवाच्या एका काेकणस्थ ब्राह्मणाने गांधीजींचा वध केला. ती घटना अनपेक्षित हाेती. परंतु, त्या घटनेमुळे एक विलक्षण अशी सामाजिक प्रक्रिया घडली. महाराष्ट्रातील गांवा गांवात रहाणार्या काेकणस्थ ब्राह्मण जातीच्या सर्वच लाेकांना गांवातील मराठा जातीच्या लाेकांनी हकलून दिले. ते हकलून दिलेले ब्राह्मण जे त्यांच्या गांवात संपन्न जीवन जगत हाेते ते क्षणांत निर्वासित झाले. ही हकलून दिलेली ब्राह्मण मंडळी मुंबई, पुणे अशा शहरांत गेली व तेथील शहरी जीवनात सामावून घेतली गेली. शहरातील प्रगत, सुसंस्कृत जीवनात रमून गेली. त्यांची मूळची ग्रामीण, मागासलेली व बरीचशी अनाडी वागणूक त्यांनी साेडून दिली. ते जास्त सुशिक्षित, सुसंस्कृत व रुबाबदार झाले. त्यांची भाषा जी गांवठी हाेती ती पूर्णतया बदलून गेली. आता ते पूर्णपणे शहरी झाले. एका गांवठी समाजाचा असा हा माेठा कायापालट झाल्याचे दिसून येते. आणि त्याला कारण नथुराम गाेडसे हाेता.
हे सर्व माझ्या तेव्हां लक्षात आले जेव्हां मी कांहीं वर्षापूर्वी सातारा शहरात माझ्या एका काेकणस्थ ब्राह्मण मित्राला भेटण्यास गेलाे हाेताे. तेथे त्यांनी मला हे सांगितले, तेव्हां माझा त्यावर बिलकूल विश्र्वास बसला नाही. तेव्हां ताे मला जवळच्या सज्जनगडा नजिकच्या एका गांवात घेऊन गेला. गांधी वधानंतरही, तेथील गांवातील ब्राह्मणांची हकालपट्टी झाली नव्हती. तेथील ब्राह्मणांचे जीवन त्यांने मला जवळून दाखवले. मी ते पाहून आश्र्चर्यचकित झालाे. ते लाेक ब्राह्मण आहेत हे प्रथम मला पटलेंच नाही. इतके गांवंढळ, अशिक्षित हाेते ते ब्राह्मण किं मला जर काेणी असे सांगितले असते तर मी त्यावर विश्र्वास ठेवला नसता पण मी ते स्वत: पहात हाेताे म्हणून विश्र्वास ठेवला. जर ब्राह्मणांची हकालपट्टी झाली नसती तर हे काेकणस्थ ब्राह्मण कसे जगत राहिले असते ते मी पहात हाेताे. तेथील बहुतेक ब्राह्मण अशिक्षित हाेते. त्यांची बाेलीभाषा त्या भागातील इतर लाेकांसारखीच ग्रामीण हाेती. त्यांच्या चालीरीती त्या भागातील इतर जातींसारख्याच हाेत्या. जमिनजुमला चांगला हाेता व म्हणून अार्थिक परिस्थिती बर्या पैकीं हाेती. आधुनिक शिक्षणाचा त्यांना साधा परिचयसुद्धा नव्हता. हे पाहिल्यावर मात्र माझा माझ्या ब्राह्मण मित्राच्या बाेलण्यावर विश्र्वास बसला. म्हणजे जर गाेडसेनी गांधींचा वध केला नसता तर एकंदर ब्राह्मण लाेक कसे राहीले असतें ते पाहिल्यावर माझ्या मनांत असा विचार आला किं, गांधीवध हि घटना जरी दुर्दैवी हाेती तरी त्याचा एक परिणाम ह्या काेकणस्थ ब्राह्मण जातीच्या कल्याणाचा, फायद्याचा, झालेला आढळून आला. शहरात आलेल्या ब्राह्मणांनी त्यांचा पाैराेहित्याचा व्यवसाय साेडून उच्चविद्या विभूषित झाले, काेणी डॉक्टर, वकिल, चार्टर्ड अकाैंटंट अशा उच्च शिक्षणांने आपली प्रगती करून काेठल्या काेठे गेले त्याला कांहीं मर्यादा राहीली नाही.
गावांतून हकालपट्टी झाल्यामुळे त्यांच्या जमिनी गेल्या पण आज जे सामर्थ्य ह्या लाेकानी मिळवले आहे ते त्या जमिनींपेक्षा कितीतरी जास्त माेलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. एका ब्राह्मणांने स्पष्ट कबूली दिली किं, गाेडश्यांनी जे केले त्यामुळे त्यांच्या समाजाचा फायदाच झाला आहे. एकंदर असे म्हणावे लागेल कीं, काेकणस्थ ब्राह्मणांचा आज जाे विकास झालेला आपण पाहताे ताे नथुराम गाेडशाच्या कामामुळे झालेला आहे! वाईटातून कांहीं चांगले निघते असे जे म्हणतात ते येथे पटते. एकापरीने काेकणस्थ ब्राह्मणांनी नथुराम गाेडसे ह्यांचे आभार मानले पाहिजेत, त्याचा बळी गेला ताे एकदमच फुकट गेला नाही असे मानावे लागेल. एकाने तर नथुरामची तुलना परशुरामाशी केली, ताे म्हणाला, नथुराम गाेडसे हे आधुनिक परशुरामच ठरले आम्हा ब्राह्मणांच्या दृष्टीने! दुसर्या एकाने आणखीन कांहीं सांगितले (त्याने परशुराम, पहिला बाजीराव पेशवा व नथुराम ह्याच्यामुळे काेकणस्थांचा कसा कायापालट झाला ते सांगितले) पण त्याबद्दल नंतर कधी बाेलू.
पुढील पाेस्ट मध्ये अंधश्रद्धा व श्रद्धा ह्यातील फरकाबद्दल गप्पा मारूया.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लाेक २२ – ३५ वाचू या.
काेणत्या वर्णास काेणता लग्न विधी याेग्य व काेणता अयाेग्य ते एेका. त्याच प्रमाणे, अशा लग्नांचा त्यापासून हाेणार्या अपत्यांवर काय परिणाम हाेताे ते सुद्धा सांगताे. २२
क्रमांने पहाता, ब्राह्मणांसाठी पहिले सहा लग्न विधी याेग्य असतात. शेवटचे चार क्षत्रियांसाठी चांगले असतात, व तेंच चार विधी राक्षस विधी वगळतां वैश्य व शुद्रांस सांगितले आहेत. २३
ऋषींच्या मते, पहिले चार ब्राह्मणांसाठी याेग्य आहेत, क्षत्रियांसाठी राक्षस व वैश्य आणि शुद्रांसाठी असूर विधी सांगितला आहे. २४
परंतु, ह्या पवित्र नियमांत वेगळे दिले आहे. त्या प्रमाणे, शेवटच्या पांचांपैकीं पहिले तीन विधी वैध व उरलेले दाेन विधी अवैध समजावेत. पैशाची व असूर विधीने (ब्राह्मणांने) लग्न कधीच करू नये असें पवित्र नियम सुचवतात. २५
पवित्र नियमांनुसार क्षत्रियांस गंधर्व व राक्षस विधी विभक्त अथवा एकत्रपणे याेग्य सांगितले आहेत. २६
टीप: श्री कृष्णाने रुक्मिणीशी ह्यारितीने लग्न केले हाेते.
पित्याच्या ऐपतीनुसार, उपवर कन्या दागदागिन्यांनी मढवून सन्मानपूर्वकपणे वेदांतील ऋचांच्या उच्चाराने शुद्ध करून अशा परिस्थितीत नवरदेवाला सन्मानपूर्वकपणे आवाहन करून लग्न हाेते ताे ब्रह्म विधी समजावा. २७
यज्ञयाग करणार्या पुराेहितांस जेव्हां, त्यावेळी उपवर कन्येचा पिता तिला सालंकृत करून सन्मानपूर्वकपणे, कन्यादान करताे ताे देव विधी समजावा. २८
नवरदेवा कडून पवित्र नियमांनुसार गाय, बैल (दाेन जाेड), घेऊन उपवर वधुचा पिता तिला कन्यादानानें देताे ताे विधी ऋषी (अर्श) विधी समजावा. २९
टीप: हे सर्व दान पुन: त्या मुलीस तिचे स्त्रीधन म्हणून वधु पित्याने द्यावयाचे असते.
स्मृतीच्या परंपरेनुसार जेव्हां उपवर वधुचा पिता उभयतांना (नवरा व नवरी) त्यांची वैवाहिक कर्तव्ये समजावून सांगताे व मग त्यांचे लग्न झाले असें घाेषीत करताे, ताे प्राजापत्य विधी समजावा. ३०
जेव्हां उपवर मुलीस व तिच्या कुटूंबास धनदाैलत देऊन सर्वसंमतिनें लग्न केले जाते तेव्हां ताे असूर विधी असें समजावे. ३१
टीप: जर कन्या कुमारिका नसेल तर ब्रह्म, देव, अर्श आणि प्राजापत्य पद्धतीने जरी लग्न केले तरी ते असूर विधीचे समजावे.
समाजाच्या मान्यतेचा विचार न करतां, स्वेच्छेने जेव्हां स्त्री व पुरूष एकत्र हाेतात जेथे केवळ शरीर सुख एवढांच काय ताे उद्देश असताे, समाज, कुटूंब इत्यादींचा विचार नसताे, त्याला गंधर्व विवाह असें समजतात. ३२
टीप: हल्ली ह्या विवाहास प्रेमविवाह असें म्हणतात. गंधर्व विवाहाला समाजाचा नेहमीच विराेध असताे.
जबरदस्तीनें मुलीच्या नातेवाईकांचा विराेध असतांना प्रसंगी त्यांना मारून मुलीच्या इच्छे विरूद्ध अशारितीने जाे विवाह केला जाताे, त्यास राक्षस विवाह असे समजले जाते. ३३
टीप: विवाह हा शब्द मुळात राक्षस लग्नासाठी आहे परंतु, आज ताे शब्द सगळ्या लग्न विधींसाठी वापरला जाताे आहे.
मुलीला खाेटी आश्र्वासने देऊन, तिच्या नातेवाईकांना फसवून, तसेंच वेळी तीला झाेपेत असतांना पळवून जे लग्न केले जाते ताे पापकारक असा लग्न प्रकार पैशाची विवाह विधी समजावा. ३४
टीप: पैशाची म्हणजे, पठाण लाेक, पठाण लाेक अशारितीने लग्न करीत असतं.
ब्रह्मलग्न ब्राह्मणांत सर्वमान्य समजले जावे. त्यात कन्यादान करतांना अर्ध्य देणे चांगले समजले जाते. इतर वर्णांत बाेलणी करून सामंजस्याने हा विधी करतात ते याेग्यच आहे. ३५
टीप: गंधर्व, राक्षस, पैशाची हे लग्न प्रकार समाज अवैध समजताे.

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी