बुधवार, २९ जून, २०१६

अरबांची कुत्री – ६

मागील पोस्ट पासून पुढे चालू

अशारितीने अबु बक्रने आरेमियन लोकांच्या मदतीने इराकचा बराच मोठा भाग काबीज केला. तरी प्रत्यक्ष इराणात शिरण्यास त्याचे लष्कर घाबरत होते. कारण, परशियाचे त्यांच्यावर गेली हजार वर्षे राज्य होते त्यांच्या अधिपत्या खाली रहाण्याची त्यांना एका प्रकारे सवय झाली होती. त्या मनोगंडावर मात करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांना आणखीन एक धूर्त डावपेंच वापरणे क्रमप्राप्त होते. त्यांनी सांगण्यास सुरुवात केली किं, त्यांची परंपरा इराण्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे म्हणूनच देवांने त्याचा प्रेषित, महमद ह्याला अरब म्हणून पाठवले. हा युक्तिवाद परिणामकारक ठरला आणखीन बरेच स्थानिक लढवय्ये त्यांच्या सैन्यात सामील झाले.

इराक त्या बरोबर सिरीयाचा मोठा प्रदेश त्या अनुषंगाने तेथील बाजारपेठ अरबांच्या ताब्यात आली होती त्या परिस्थितीचा पुरेपुर फायदा उठवण्याचा प्रयत्न अरब करू लागले. अरबेतरांना बाटवल्याने त्यांच्यात अरबीकरण केल्यामुळे अरबांना त्या प्रदेशावर राज्य करणे सोपे झाले होते हा अरबेतरांना बाटवण्याचा डावपेज हुकमी एक्का ठरला होता. त्यामुळे त्या सत्तालोलुप अरबांच्या मनातून महमदाचे मत चुकीचे होते अबु बक्र जास्त बरोबर आहे असा समज बळावला.

बाजारपेठा ताब्यात आल्यानंतर अरबांनी आणखीन एक खुळ चालू केले. त्यांनी असा नियम केला किं, ज्या कोणाला तेथे व्बापार उदीम करावयाचा असेल त्याला इस्लाम स्वीकारावा लागेल. हिंदूस्तानातून मोठ्या प्रमाणात व्यापारी तेथे व्यापार करीत होते. त्यातील बहुतेक सिंध, पंजाब, बलुचिस्तान, पख्तुनिस्तान अशा आजच्या पाकिस्तानातील होते त्या बरोबर कांहीं व्यापारी गुजरातेतील होते. त्यात लोहाणा भाटीया जातीतील जास्त होते. अशा बर्याच हिंदू व्यापार्यांना ह्या एका कायद्याच्या मदतीने बाटवण्यात ते यशस्वी ठरले. अशारितीने आजच्या पाकिस्तानातूल लोक केवळ व्यापाराच्या करारामुळे मुसलमान झाले. आज तो करार अस्तित्वात नाही पण जे एकदा बाटले ते तसेंच मुसलमान राहीले.

हे केवळ व्यापाराच्या आमिषाने बाटलेले हिंदू स्वदेशात हिंदू अरबस्तानात मुसलमान असे दुहेरी धर्माचे आचरण करीत होते. म्हणजे जेव्हां ते हिंदूस्तानात असतं तेव्हां ते हिंदू धर्माचे पालन करीत जेव्हां ते व्यापाराच्या निमित्ताने अरबस्तानात असतं तेव्हा ते मुसलमान असल्याचा बहाणा करीत असत. त्यांनी अरबांची भाषा, वेशभूषा आणि चालरीत स्वीकारली नव्हती. म्हणून अरब त्यांना त्यांच्या बरोबरीचे मानत नव्हते. हे केवळ व्यापाराच्या मोहांने बाटलेले लोक अरबांच्या दृष्टीत स्वाभिमानशून्य, लोचट, लाचार हलकट असें ठरले होते. त्यांना ते मवालीसुद्धा मानत नव्हते. अरबांच्या दृष्टीने हे हिंदूस्तानी लोक कुत्र्यासमान होते. करण त्यांच्यासाठी ते कुत्र्याप्रमाणे होते. जे लोक केवळ पैशासाठी आपला इमान सोडतात ते कसले लोक असे अरब त्यांच्या बद्दल समजत होते आजसुद्धा अरब ह्या लोकांच्या बाबत असेंच मानतात ह्या लोकांना त्यांची कुत्रीच समजतात. एका अरब व्यापार्याने मला सांगितले किं, अरबांची कुत्री सर्वच देशांत आहेत त्यांच्या जोरावर ते बरेच कांहीं करू शकतात. ते अरबेतर मुसलमानांना त्यांची कुत्री असा उल्लेख करतात. दुबईच्या शेखने एकदा सांगितले किं, हिंदूस्तानातील मुसलमान खरे मुसलमान नाहीतच!!

पुढील पोस्ट मधून हा विषय चालू राहील. -
मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या १०१११९
वेदाचा अभ्यास करणार्यांनी कांहीं प्रसंगी वेदाचे अध्ययन करावयाचे नसते ते प्रसंग कोणते ते पाहूया. जो विद्यार्थी शिकवण्याचे काम करतो त्यांनेसुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे. १०१
पावसाळ्यात जेव्हां जोराने पाऊस पडतो मोठ्याने आवाज होतो, विजा कडकडत आहेत, वारे घो घो असा आवाज करत आहेत, तेव्हां मोठे चमकणारे अशनि पृथ्वीवर कोसळतात, वादळामुळे वावटळ उठते अशावेळी वेदाचा अभ्यास करू नये. १०२
मनु सांगतो किं, ज्यादिवशी असें होते त्याच्या दुसर्या दिवशीसुद्धा अभ्यास करू नये. १०३
जेव्हां वर दिलेले चमत्कार एकत्रपणे संधीप्रकाशाच्या वेळी दिसतात, अग्निहोत्र चांगले तेजाळले आहे, अशावेळी वेदाचे वाचन बंद करावयाचे असते. आकाशात फार ढगे अकाळी जमली असतील ज्यामुळे सूर्याचा प्रकाश मंद झाला आहे तेव्हां वेद पठण करावयाचे नसते. १०४
जर आभाळात विचित्र प्रकारचे भयंकर आवाज उत्पन्न झाले, धरणीकंप झाले, चंद्राभोवती खळ दिसले जरी ते पावसाळ्यात दिसले तरी त्यापासून चोवीस तास पर्यंत वेदाचे वाचन बंद करावयाचे असते. १०५
पवित्र अग्नी तेजाळल्यानंतर जर वर दिलेल्या गोष्टी घडल्या तर सूर्यप्रकाश अथवा तार्यांचा प्रकाश दिसतो तोवर अध्ययन बंद ठेवावयाचे असते. हा नियम रात्री दिवसा असा दोनही वेळा पाळावयाचा असतो. १०६
ज्यांना वेदांत पारंगत वपावयाचे आहे मग ते कोठेही शिकत असतील (गांवात अथवा नगरात) ते महत्वाचे नाही. तसेंच जर दुर्गंधी पसरली असेल तरीसुद्धा वेदाचे वाचन बंद करावे. १०७
गर्दी गोंधळ असलेल्या परिस्थितीत, शुद्र उपस्थित असेल तर, रडणे होत असेल तर, प्रेत घरात आहे, अशा वेळी वेदाचे वाचन करावयाचे नसते. १०८
पाण्यात असतांना, मध्यरात्री, शौंचास करतांना, अस्वच्छ असतांना, श्राद्धाचे जेवण खाल्यानंतर, अशा प्रसंगी वेदाचा साधा विचारसुद्धा करू नये. १०९
ज्ञानी ब्राह्मण तीन प्रसंगी वेदाचा विचार करणार नाही, जेव्हां तो त्याच्या एका पूर्वजाच्या एकोद्धिष्ट श्राद्धाच्या जेवणाचे आमंत्रण स्वीकारतो, जेव्हा त्याच्या राजाला सुतक अथवा सुयेर लागलेले असते, किंवा राहूने चंद्राला ग्रहण केलेले असेल. ११०
जोवर श्राद्धाच्या जेवणाचे डाग त्याच्या अंगावर आहेत तोवर तो वेद पठण करणार नाही. १११
बिछान्यावर पहुडला असतां, पाय बाकांवर ठेवले असतां, मांडी घालून बसलेले असतांना जेव्हा त्याचे दोनही गुडघ्यावर कापड बांधले असतांना, तो वेदाचा अभ्यास करणार नाही. जेव्हां तो हलक्या कुळातील व्यक्तीने वाढलेले जेवळ खातो तेव्हां सुद्धा वाचन करावयाचे नाही. ११२
जेव्हां परिसरात धुके पसरले आहे, बाणांचा मोठा आवाज होत आहे, दोनही संधीप्रकाशाच्या वेळी, प्रतिपदेस, अष्टमीस, चतुर्दशीला पूर्णिमेला वेदाचे वाचन करावयाचे नसते. ११३
प्रतिपदेस वाचन केले तर शिक्षकाचा नाश होतो. अष्टमी पूर्णिमेस वाचन केले तर विसर पडतो, चतुर्दशीस केल्यास विद्यार्थ्याचे नुकसान होते, म्हणून ह्या दिवशी वेदाचे वाचन करावयाचे नसते. ११४
लोकांत बसला असतांना, धुळीचे वादळ असतांना, आकाशात भयंकर लाली पसरली असतांना, कोल्हेकुई, कुत्र्याचे भुंकणे होत असतांना, मांकडे ओरडतात तेव्हां, उंट खिंकाळतात तेव्हां, वेद वाचावयाचा नाही. ११५
श्राद्धात भेटवस्तु घेतल्यावर, स्मशानात, गांवात, गाईच्या गोठ्यात, संभोग घेतल्यावर त्याच वस्त्रात असतांना त्यांने वेद वाचू नये. ११६
श्राद्धात मिळालेली भेट प्राणी असेल अथवा निर्जीव असेल ती स्वीकारल्यावर थोडावेळ पर्यंत ब्राह्मणांने वेदोच्चार करावयाचे नसतात. ११७
गावांत चोर घुसले असतांना, त्याबद्दलची सुचना मिळाली असतांना, वेदाभ्यास थांबावयाचा असतो. दुसर्या दिवशी शुभ सुचना मिळाल्यानंतर तो सुरु करावयाचा असतो. ११८
उपकर्मन विधीच्या वेदोत्सर्गच्या वेळी वेदाचे वाचन तीन दिवसासाठी बंद ठेवावयाचे असते. तसेंच अष्टकाचे आणि मोसमाच्या शेवटच्या दिवशी त्या रात्री सुद्धा ते करावयाचे नसते. ११९

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.