बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

हिंदू कोण - ३

मागील पोस्ट पासून चालू -
यजुर्वेदि ब्राह्मण यजुर्वेदाचे पालन करीत नाहीत, ऋग्वेदि ब्राह्मण ऋग्वेदाचे पालन करीत नाहीत, जे शंकराचार्य आहेत ते कोणत्याही सनातन परंपरांचे पालन करीत नाहीत, हे सर्व ब्राह्मण प्रत्यक्षात फक्त आणि फक्त जैन रीवाजांची नक्कल करीत असतात. हि मोठी फसवणूक हिंदूंची होत आहे आणि हे सर्वकांहीं होत आहे कारण हिंदू त्याच्या धर्माबद्दल अनभिज्ञ आहे. ह्याबद्दल बरेच लिहीता येईल परंतु तो आपल्या ह्या पुस्तकाचा विषय नाही म्हणून एवढेच लिहीतो. आजचा ब्राह्मणधर्म उत्क्रांत होत नाही, ते स्वताला सनातन सांगतात परंतु, प्रत्यक्षात ते मागासलेला असा जैनधर्म पाळत आहेत. हिंदू परंपरा सतत उत्क्रांत होत असतात. हिंदूंच्या ह्या सतत उत्क्रांत होण्याच्या स्वभावामुळे (सनातनी) ब्राह्मण हिंदू ह्यात बर्याच वेळा मतभेद झालेले दिसतात. हिंदूंत देवांची सर्व रुपं सारखीच आदरणीय असतात, परंतु, ब्राह्मण फक्त हिंदूस्थानातील तीसुद्धा कांहीं दैवतेंच आदरणीय मानतात इतरांचा द्वेष करतात. जर हे दोन वेगवेगळे (धर्म) आहेत असें सर्वमान्य झाले तर हे मतभेद त्यातून उत्पन्न होणारे तणाव नाहीसे होतील, आणि ब्राह्मणांचे हिंदूंतील जीवन कारभारात ढवळाढवळ करणे हिंदूंना खोटे मार्गदर्शन करणे बंद होईल. हिंदूसुद्धा ब्राह्मणांकडे मार्गदर्शनासाठी विचारणा करणार नाहीत. हिंदूंना त्यांच्या परंपरा त्यांच्यातील बुजुर्ग वृद्ध शहाणी माणसे मार्गदर्शन करण्यास समर्थ आहेत. हे साध्य होण्यास मदत म्हणून मी ब्राह्मणेतर हिंदूंना त्यांच्या परंपरांची माहिती व्हावी ह्या उद्देशाने "हिंदू कोण?" हे पुस्तक रचले आहे. हे पुस्तक दोन भागांत आहे, त्यातील पहिल्या भागात हिंदूंच्या विविध परंपरांची माहिती त्यांचे आधुनिक विज्ञानानुसार विवेचन दिले आहे. दुसर्या भागांत हिंदूंच्या विविध तत्त्वज्ञान शाखांचा परिचय दिला आहे, त्याशिवाय इतर धर्मांची माहिती दिली आहे त्यामुळे हिंदूंना त्यांचा सतत उत्क्रांत होणारा धर्म किती जास्त योग्य आहे ते समजेल. मला हे काम करतांना अनेक ब्राम्हणेतर हिंदूंनी त्याच्या कडील प्रश्र्न पाठवून मोठी मदत केली त्या बद्दल त्यांना धन्यवाद.
हिंदू कोण? पुढे क्रमशः चालू -
मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - २४५०
सर्व अधिकृत घट्ट नरम खाद्यपदार्थ ब्राह्मण खाऊ शकतो. परंतु, शीळे, चरबीयुक्त आणि श्राद्धात दिलेले जेवणातील उरलेले खाऊ नये. २४
जव गहू ह्यांचे पदार्थ दुधाबरोबर जरी कितीही शिळे असले तरी खाल्ले तरी चालतील पण त्यात चरबी नसावी. २५
अशारितीने द्विजांनी कोणते कसे खावे ते सविस्तरपणे पाहिले आता खाण्याचे नियम मांस खाणे केव्हा टाळावे ते पहावयाचे आहे. २६
मांस पाण्याने विसळून शुद्ध केल्यावर खाण्यास योग्य होते. ते करतांना मंत्रांनी तो विधी संपन्न करावा. तसेंच जेव्हां ब्राह्मणाला खाण्याची इच्छा होईल, मंत्रविधी पूर्वक यज्ञ करतांना, तब्येत सुधारण्यासाठी त्यांने मांसाहार करावा. २७ टीपः आराध्य देवतेचे स्मरण करून तिला ते मांस मंत्रविधी अर्पून करावा.
ह्या ब्रह्माच्या निर्मात्याने हे जे सर्व उत्पन्न केले आहे ते सर्व ब्रह्मतत्त्वाच्या उपजिवीकेसाठी आहे असें मानून म्हणजे, सर्व चराचर अचर गोष्टी ह्या ब्रह्मतत्त्वाच्या उपजिवीकासाठीच असतात. २८
अचर गोष्टी (वनस्पति इत्यादी) चरांच्या उदरनिर्वाहासाठी असतात, दांत नसलेले दांत असणार्यांचे खाद्य असते, ज्यांना हात नाहीत (पशु, पक्षी मांसे) हात असलेल्यांचे खाद्य असते, जे भित्रे असतात ते धीटांचे खाद्य असते. २९
खाणारा रोज त्याच्या भक्षास खातो त्यामुळे त्याला पाप लागत नाही. कारण, विश्र्वनिर्मात्यांने खाणारा खाल्ले जाणारा असे दोनही प्रकारचे जीव सृष्टीच्या व्यवहारांसाठी निर्माण केले आहेत. थोडक्यात असे म्हणता येईल किं, जीव जिवावर जगतो. ही निसर्गाची रचना आहे म्हणून उगाचच त्यात मानवी अल्पबुद्धीने दोष हुडकण्याचा प्रयत्न करू नये. ३०
यज्ञात मांसाहार करणे उचित आहे. असें देवांनी केलेल्या नियमांनुसार आहे. त्याशिवाय उगाचच प्राणी मारणे हे राक्षसी कार्य ठरते म्हणून ते टाळावे. ३१ टीपः खाण्यासाठी प्राणी मारावयास हरकत नाही.
जेव्हां पितरांच्या देवांच्या नांवाने ब्राह्मण मांस खातो तेव्हां ते पाप ठरत नाही. मग, ते मांस त्यांनी विकत घेतलेले असेल अथवा स्वतः प्राणी मारून आणले असेल किंवा कोणी भेट दिले असेल कसेही असले तरी हरकत नाही. ३२
द्विज जो पवित्र नियम जाणतो त्याने कधीही ह्या नियमांबाहेर जाऊ नये. जर त्यांने नियमबाह्य मांस खाल्ले तर मृत्यूनंतर तो त्याच्या शत्रूंकडून खाल्ला जाईल. ३३
फायद्यासाठी हरीण मारणारा नियमबाह्य मांस खाणारा (वासनेपोटी) हे दोघेही एकासारखेच ठरतात. ३४
त्याचप्रमाणे जो ब्राह्मण श्राद्धात दिलेले मांस खाण्यास विरोध करतो तो त्याच्या मृत्यूनंतर एकवीसवेळा बळीचा प्राणी म्हणून जन्म घेतो. ३५
मंत्रांनी शुद्ध केलेले मांस द्विजांनी खाऊ नये. परंतु, सनातन रिवाजांनुसार तो वेदमंत्रांनी पुनीत केलेले मांस खाऊ शकतो. ३६
जर त्याला पशू खाण्याची तीव्र इच्छा झाली तर त्याने शुद्ध लोण्याचा अथवा पीठाचा बनवून तो खावा त्यावर समाधान मानावे. पण कधीही शास्त्राबाहेर जाऊन मांसाहार करू नये. ३७
जर ब्राह्मणांने शास्त्राबाहेर जाऊन मांसाहार केला तर त्या प्राण्याच्या अंगावर जेवढे केस होते तितक्या वेळा तो यम यातना त्याच्या पुढच्या जन्मी भोगेल. ३८
स्वयंभूने हे सर्व प्राणी यज्ञासाठी निर्माण केले आहेत, यज्ञविधी सर्व जगाच्या भल्यासाठी असतात, म्हणून यज्ञात बळी देणे हे एर्हवी बळी देण्यासारखे नसते. ३९ टीपः मारण्या मागील उद्देश महत्वाचा असतो.
वनस्पती, झाडे, गुरं, पक्षी आणि इतर प्राणी यज्ञात बळी दिले जातात ते सर्व मेल्यानंतर उच्च गतिस जातात. ४० टीपः यज्ञात फक्त सजीव बळी जातात ह्यावरून हे स्पष्ट होते किं, मनुस्मृतीच्या काळी हे सर्व सजीव आहेत हे माहीत होते.
पितरांच्या सन्मानार्थ श्राद्धात मध-लोणी यज्ञात देतांत तेव्हां जनावराचा बळी देणे हे शिष्टसंमत आहे असें मनु जाहीर करतो. ४१
जो द्विज वेदातील आदेशांनुसार बळी देतो तो त्यांनी मारलेले प्राणी असें दोघेही स्वर्गात जातात. ४२
द्विज जो गुणवान आहे तो कधीही, मुक्या प्राण्याला विनकारण इजा करणार नाही, मग तो कोठे राहतो ते महत्वाचे नसते. कारण, मुक्या प्राण्यला इजा करणे वेदसंमत नाही. ४३
वेदाच्या नियमांनुसार ज्या प्राण्यांना अथवा अचरांना (वनस्पती) मारण्यास हरकत नाही त्यांची हत्त्या करणे पाप ठरत नाही. ४४
केवळ मनोरंजनासाठी निरुपद्रवी प्राण्यांना इजा करणे हे कृत्य त्याला कोणत्याही जन्मात आनंद मिळवीन देत नाही. ४५
जो जीवांना इजा करीत नाही, जो सर्वांचे सुख चिंतितो, तो उत्तम गतीला जातो. ४६
जो जीवांना इजा करीत नाही तो जे इच्छिल, जे काम करील, त्या सर्वांत यशस्वी होईल. ४७
मांस दुःख दिल्याशिवाय मिळत नाही आणि दुःख देणे अध्यात्मिक प्रगतीस घातक असते म्हणून शक्यतर मांसाहार टाळावा. ४८ टीपः मनुस्मृतीच्या काळात विनावेदना मारणे शक्य नसल्यामुळे हे लिहीले आहे. वस्तुतः विनावेदना मारणे आता शक्य असल्याने हे आजच्या काळात लागू होत नाही.
प्राणी मारण्यातील क्रौर्य लक्षात घेतां मांसाहाराचा त्याग करावा. ४९
जो मांसाहाराचा पूर्णतया त्याग करतो तो सर्वांना प्रिय होतो. ५०

मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.