सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

हिंदू कोण – १६

देवांच्या अस्तित्वा बाबत
क्रमशः मागील भागातून चालू -
इस्लाममध्ये त्यांचा उल्लेख जीन म्हणून केला जातो. हे गण शीव, काली, गणपती मारुती ह्याच्या आधिपत्याखाली काम करीत असतात असें मानले जाते. इतर धर्मांत ही व्यवस्था आढळत नाही. आपण आधी पाहिलेले ईश्र्वर, पितर आणि पिशाच्च ह्यांहून ही आणखीन वेगळी दैवते आहेत. इतर धर्मांत दैविक शक्तिंची एवढी पद्धतशीर रचना केलेली आढळत नाही. हिंदूंतील ही दैवतांची सुंदर रचना पहाता इतर धर्म त्या बाबत मागासलेले आहेत हे स्पष्ट होते. ह्याठिकाणी आपण पाहिले असेल किं, देव हा शब्द वेगवेगळ्या प्रसंगी निरनिराळ्या अर्थाने योजला जात आहे. कधी तो परमेश्र्वर ह्या अर्थी तर कधी तो ईश्र्वर ह्या अर्थी तर कधी तो देव म्हणून असा वापरला जातो जसें इंग्रजीतील गॉड हा शब्द वापरला जातो. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. त्यासाठी तो वाचतांना त्याचा संदर्भ पाहून कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते पाहून तो अर्थ समजावा. पुराणातील कथांमधून देव, दैत्य, यक्ष, राक्षस असें सर्व आपण वाचत असतो. बुद्धाच्या जातक कथांमध्ये गंधर्व, यक्ष ह्यांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे साधारण हिंदू माणसास त्यांचा बर्यापैकी परिचय असतो. विविध देवतांच्या स्वरुपाबद्दल थोडी आणखीन माहिती पाहूया.

२४. प्रत्येक देवतेला दोन अंग असतात. एक अंग असते, नरवाचक व दुसरे असतें, स्त्रीवाचक. त्याचा उल्लेख नरनारी असा केला जातो. ही दोन रुपं दोन भिन्न वर्तणूकी व्यक्त करता. नर स्वरूप पुरुषी स्वभाव दाखवतो व स्त्री स्वरूप स्त्रीचा स्वभाव दाखवतो. आपण म्हणतो पुरुषात स्त्री असते व बाईत पुरुष असतो तसेंच हे असते. तें असें, पुरुषी स्वभाव थोडा बेपर्वा, उद्धट, घमेंडखोर, कमी दयाळू, अस्वस्थ, शंकाखोर, आगाऊ आणि आळशी असा असतो त्या प्रमाणे, देवतेचे नरस्वरुप काम करते. देवतेचे स्त्री स्वरुप स्त्रीचा स्वभाव व्यक्त करते. तो आहे, काळजीपूर्वक, नीटनेटके, ममतापूर्वक, नम्र, प्रेमळ, शांत, सावध, मेहनतू. अशा भिन्न वागणूकीमुळे देवतेचे स्त्री स्वरुप भक्तासाठी जास्त भावत असते. जर साधकांनी नर स्वरुप भक्ती करण्यासाठी निवडले तर त्याला त्या पुरुषी स्वरुपाकडून सहकार्य मिळत नाही. ते भक्ताची सतत परीक्षा घेत रहाते. पण जर देवतेचे स्त्री स्वरुप भक्तीसाठी निवडले तर त्या देवतेकडून भक्तास चांगले सहकर्य मिळते. आपण पहातो किं, आई ही वडीलांपेक्षा जास्त जवळची मुलांना वाटते तसें हे असते. म्हणजे, शंकरापेक्षा अंबेची पुजा करणे नेहमीच जास्त श्रेयस्कर असते. पांडुरंगापेक्षा रखुमाई जास्त लवकर पावते असे हे असल्याने प्रापंचिक याचकांनी नेहमी देवतेच्या स्त्री रुपाचीच भक्ति करणे चांगले असते असें समजले जाते. देवतेचे नर रुप भक्ताची जरा जास्तच परीक्षा घेत असते तसें देवतेचे मायरुप करीत नाही. थोडक्यात असे सुचवावयाचे आहे कीं, प्रापंचिक हिंदूंनी सहसा नररुपाची भक्ती न करतां माय रुपाचीच भक्ती करावी. विशेषकरून जर ती भक्ती सकाम असेंल तर ते जास्त आवश्यक ठरते. मोक्षार्थीनी नररुपाची भक्ती करावी. आपण पहातो किं, पंढरीचे वारकरी प्रापंचिक असून विठ्ठलाची भक्ती करतात ते ह्या प्रमाणे चुकीचे ठरते, त्यांनी रखुमाईची भक्ती केली तर ती लवकर फळेल. महाराष्ट्रातील संत संन्याशी प्रवृतीचे होते म्हणून ते विठ्ठलाची पुजा करीत होते ते बरोबर होते पण त्यांचे अंधानुकरण प्रापंचिक वारकर्यांनी करणे चुकीचे आहे.
सर्वच देवतांची अशी दोन स्वरुप नसतात. कांहीं देवतांचे फक्त एकच रुप असते. उदाहरणार्थ, शक्ती, चंडिका, संतोषी, जिवदानी इत्यादि. काहीं उग्र देवता असतात त्यांची फक्त नर रुप असतात. त्यात शनी, केतु, राहु, मंगळ अशा देवता येतात. ह्यांना कांहीं ग्रह समजतात पण त्या प्रथम देवता असतात व ज्या ग्रहांच्या नांवांने त्या ओळखल्या जातात ते ग्रह त्याची चिन्हे असतात. नारीरुप नसलेल्या देवतां माणसास शिक्षा करण्याचे काम करण्यासाठी असतात, त्या कारणांने त्यांना नारीरुप नसते. महेश, विष्णू, गणपती ह्या देवतांची स्त्री रुपे आहेत पार्वती व तीची असंख्य रुपं आणि विष्णूचे स्त्री रुप आहे लक्ष्मी, गणपतीचे सरस्वती. ब्राह्मण ह्याचे पतीपत्नी अशी नाती सांगतात पण हे अतिशय चुकीचे असते कारण पती-पत्नी असे नाते फक्त माणसातच शक्य असते. कारण माणसात वासना असते आणि त्याचे प्रजनन लैंगिक संबंधाने होत असते. दैवतांमध्ये लैंगिक प्रजनन होत नाही आणि त्यांना लैंगिक वासनासुद्धा नसते. त्यांचे माणसाप्रमाणे प्रजनन होत नसल्यामुळे त्याचे असें नाते सांगणे हे केवळ ह्या विषयाचे अज्ञान सिद्ध करते. महादेवाचे जे अर्धनारी स्वरूप आपल्या पूर्वजांनी दाखवले आहे तेंच खरे हे स्वरुप आहे. म्हणजे, महेश व पार्वती हे एकच असतात हे हिंदू साधकांनी समजले पाहिजे. हिंदूंच्या ह्या देवता ह्या दोनही रुपात पुजल्या जातात. त्या दोन वेगवेगळ्या देवता आहेत असे समजू नये. म्हणजे शंकराची आराधना करणे व अंबेची आराधना करणे हे एकच असते. पुराणांमध्ये अनेक कथा आहेत त्यांमुळे ह्या देवतांच्या रुपांबद्दल बरेच गैरसमज पसरतात, त्यासाठी त्या पुराणातील कथांना पुराणातील वांगी असें समजून दुर्लक्ष करावे हेंच श्रेयस्कर ठरेल. प्रत्येक देवतेचे चिन्ह म्हणून कांहीं प्राणी योजले आहेत जसें, मारुतीचे चिन्ह माकड, गणपतीचे हत्ती, आश्र्विनीकुमारांचे घोडा, विष्णूचे सिंह, दत्ताची गाय व कुत्री वगैरे. पुढे पुराण काळी, कोणी त्या देवतेला त्या प्राण्याचे तोंड लावले अशारितीने बदल होत गेले. माझ्यामते ह्यात बदल व्हायला पाहिजे. तो असा किं, त्या प्राण्याचे तोंड त्या देवतेला न लावता ते चिन्ह देवतेच्या मुकुटात, हातातील राजदंडात अथवा कमरपट्ट्यात योजावे म्हणजे, जे गैरसमज होतात ते होणार नाहीत. किंवा त्या देवाच्या बाजूस दत्तामागे जशी गाय व कुत्री दाखवतात तसें गणपतीच्या बाजूस हत्ती, मारुती भोवती माकडे असें दाखवून ती चिन्हे व्यक्त करता येतील.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू – ९१ – ९७
विद्यार्थी, गृहस्थ, जोगी व संन्यासी हे चार मार्ग जर द्विज अवलंबित असेल तर त्यांने पुढील दहा नियमांचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे. ९१
समाधानी प्रवृत्ती, क्षमाशिलता, संयम, वाईट गोष्टींपासून (चोरी, खोटे बोलणे वगैरे) दूर रहाणे, शुद्धता पाळणे, भोगइंद्रियांचे संयमन, शहाणपणा बाळगणे, आत्म्याबाबत सावधानता, सत्यव्रत, न रागावता कामे करणे, असे हे नियम आहेत. ९२
जे ब्राह्मण ह्या दहा नियमांचे महत्व ओळखतात व त्यांचे पालन करतात त्यांचा उद्धार होतो. ९३
जो द्विज मनोनिग्रहाने हा नियम पाळेल व तीन देणी (वेदाचा अभ्यास करणे, पुत्राला जन्म देणे व सर्व यज्ञयाग आपल्या कुवतीनुसार करणे) फेडतो तो वेदांताचा अभ्यास केल्यावर पूर्ण संन्यासी होतो. ९४
सर्व यज्ञयाग सोडून देऊन, सर्व पापवृत्तींचा त्याग करून, भोगेंद्रिये काबूत आली आहेत असा जो वेदाच्या अभ्यासात रमला आहे तो शेवटी आपल्या मुलाच्या आधाराने त्याच्या बरोबर राहिल. पूर्ण निवृत्त परंतु, संन्याशी नाही अशाप्रकारे तो उर्वरीत जीवन जगेल. ९५
क्षत्रिय व वैश्य वर्णातील गृहस्थांसाठी सर्व कर्मकांडांचा त्याग करून निरीच्छ होऊन जगणे म्हणजे संन्यास असें समजावे. ९६
अशारितीने चार वर्णांचे पवित्र नियम मी तुम्हाला सांगितले, आता राजाची कर्तव्ये कोणती ते सांहतो. ९७
भाग सहावा संपला. पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीतील सातवा भाग वाचूया.

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

हिंदू कोण – १५

३० जानेवारी २०१७
हिंदू कोण
. देवांच्या अस्तित्वा बाबत
२३. देवाला समजणे म्हणजे निसर्गाला समजणे हे लक्षात आले. म्हणून आता आपण निसर्गाचे स्वरुप पाहुया. हिंदूंतील अघोर तंत्रात जी माहिती सांगितली आहे त्यानुसार निसर्ग दोन भागांत वाटलेला आहे. एक भाग दृष्य असतो व दुसरा अदृष्य असतो. दृष्य निसर्ग जो आपण आपल्या ज्ञानेंद्रियानी जाणू शकतो परंतु, अदृष्य निसर्ग तसा आपण जाणू शकत नाही, फक्त मनाच्या विचारांनी जाणवू शकतो.
दृष्य निसर्ग अदृष्य निसर्गाच्या तुलनेने खुपच लहान असतो त्याचे नियंत्रण फार मोठा व्याप असलेला अदृष्य निसर्ग करतो. आपण ज्या आणखीन देवतांचा येथे विचार करणार आहोत त्या सर्व ह्या अदृष्य निसर्गाचा भाग असतात. विज्ञानाचे सर्व नियम दोनही भागांस सारखेच लागू होतात. अदृष्य निसर्गाबद्दल थोडी आणखीन माहीती करून घेतली पाहिजे. दृष्य निसर्गात ज्याप्रमाणे अनेक प्राण्याच्या जाती-प्रजाती आढळतात त्या प्रमाणे अदृष्य निसर्गातसुद्धा अदृष्य अशा चेतनामय (म्हणजे विचार करू शकणारी) शक्तींच्या जाती प्रजाती असतात. दृष्य निसर्गातील प्राणी जसें जन्मतात मरतात त्या प्रमाणे ह्या चेतनामय शक्तीसुद्धा जन्मतात मरतात किंवा सुप्तावस्थेत जातात. प्रसंगी त्या दृष्य निसर्गात माणसाच्या पोटीसुद्धा जन्म घेऊ शकतात. कारण, माणूससुद्धा एक चेतनामय शक्तीचेच रुप आहे. प्रसंगी सात्त्विक माणूस त्याच्या मृत्युनंतर, अशा अदृष्य निसर्गात जन्म घेत असतो. ह्या चैतन्यमय शक्तींकडे कांहीं विलक्षण सिद्धी असतात असें आपल्या पूर्वजांना समजले होते त्याप्रमाणे ते त्या चेतनामय शक्तींना अनुकूल करून निसर्गातील पंचमहाभुतांना नियंत्रित करण्याची विद्या प्राप्त करीत होते. ही माहिती शाक्त, अघोर तंत्राच्या अभ्यासांने मिळते. पाऊस पाणी, वादळे, पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महालाटा (सुनामी) अति थंडी अथवा अति उष्मा, वातावरणांत कमी दाबाचा पट्टा अथवा जास्त दाबाचा पट्टा उत्पन्न करणे त्या द्वारा पावसाचे नियंत्रण करणे, रोगराईचे नियंत्रण अशा अनेक गोष्टींचे व्यवस्थापन त्यामुळे शक्य करतां येते असा दावा केला जातो. ह्या चेतनामय शक्तींचा उल्लेख देवतां असा साधारणपणे होतो. दृष्य निसर्गातील ऊर्जा (प्रकाश, वीज, उष्णता, ध्वनी, जोर, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय जोर इत्यादि) सचेतन नसतात, त्यासाठी त्यांचे व्यवस्थापन कोणत्या तरी सचेतन प्रेरणेस करावे लागते. दृष्य निसर्गाचे अशारितीने अदृष्य निसर्गातील सचेतन शक्तींच्या सहाय्याने नियमन होत असते. म्हणून ह्या शक्तींना प्रसन्न करावे लागते त्यासाठी कांहीं तपस्या करावी लागते हेसुद्धा आपल्या पूर्वजांना माहीत होते. ह्या शक्तींना माणसाच्या भक्तीची (त्यांचे खाद्य म्हणून, जेवढे जास्त भक्त तेवढी त्यांची ताकद मोठी अशी व्यवस्था असते.) आवश्यकता असते त्याचा माणूस चतुराईने उपयोग करू शकतो. अदृष्य निसर्गाला समजणे हे एक विज्ञान आहे आज आपल्याला ह्या विलक्षण विज्ञानाची नितांत गरज आहे कारण, आज पंचमहाभुते अनियमितपणे काम करीत आहेत. ह्या अदृष्य निसर्गातील चैतन्यमय शक्ति पंचमहाभुतांचे नियमन करू शकतात हे आपल्या पूर्वजांना समजले. हे ज्ञान होण्याचे कारण, अशा चेतनामय शक्ती, जसें त्यांना माणसाच्या भक्तीची भूक लागते तसें त्या कोण्या एका, त्यांच्या दृष्टीने योग्य अशा, माणसास त्यांच्या पद्धतीने जाणीव देतात त्यानुसार तो इसम त्याची भक्ती करू लागतो त्यांने संतुष्ट झालेली ती देवता त्या भक्ताची इच्छा पूर्ण करते. अशाप्रकारचा अनुभव वेळोवेळी येत गेल्यामुळे त्यातून त्या देवतांना प्रसंन्न करण्याचे तंत्र विकसित होत गेले. त्यातून आजच्या अघोर तंत्राचा विकास झाला आहे. ह्याला कोणी अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्षिल पण हे एक विज्ञान आहे असे हिंदू मानतात त्याप्रमाणे ते त्या देवतांची भक्ती करीत असतात. आधुनिक विज्ञानाला आत्ता आत्ता असा अदृष्य निसर्ग असल्याचा सुगाव लागला आहे. हल्ली पश्र्चिमेकडील वैज्ञानिक ह्या अदृश्य शक्तिंना एलियन (Alien) म्हणून सांगतात. कारण ते असें समजतात किं, हे एलियन परग्रहावरून येतात. वस्तुतः ते येथीलच आहेत हे आपण जाणतो. हे मोठे शास्त्र असून ह्या लेखाच्या आवाक्या बाहेरचे असल्याने ह्यावर जास्त चर्चा मी करीत नाही. तंत्रात दिलेली अशा देवतांच्या जाती प्रजातींची नांवे अशी, देव, दैत्य, दानव, यक्ष, गंधर्व, नागदेवता, राक्षस, सूपर्ण आणि किन्नर आहेत. येथे त्यांची नांवे त्यांच्या सामर्थ्याच्या उतरत्या क्रमाने दिली आहेत. ह्या "देवता गण", म्हणून ओळखल्या जातात. ह्यांशिवाय आणखीन एक प्रकार देवतांचा आहे तो, गणदेव अथवा चांगली भूते, हि चांगल्या माणसांची भूतं असतात. असें लोक, जे आयुष्यभर निष्पाप जीवन जगले सात्त्विक प्रवृत्तीने परिपूर्ण होते. असें लोक, जे दुसर्यास निष्काम (कांहीं अपेक्षा ठेवता) मदत करीत होते. असें लोक, ज्यांच्या आत्म्याने त्यांच्या जीवाच्या दैहिक कारभारात कधीही ढवळाढवळ केली नाही. असें लोक, जेव्हां मरतात तेव्हां ते लोक अदृष्य निसर्गातील ह्या लोकांत जातात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात किं, जर ते एकाद्या वरील श्रेणीच्या देवतेचे भक्त असतील तर ते त्या देवतेच्या गणांत समाविष्ट होतात. जर असा इसम देव मानणारा असेल तर तो तसांच स्वतंत्रपणे तेथे रहातो. गणदेव ही चांगली पिशाच्च असतात ती सर्वच प्राणिमात्रांना त्यांचे जीवन सुखरुप करण्यात मदत करण्याची भूमिका बजावतात. जे गणदेव उच्च स्थराच्या देवतेचे गण असतात त्यांना त्यांच्या ह्या चांगल्या कामात ती उच्चस्थरीय देवता मदत करते. त्यांना त्या देवतेचे इतर गणदेवसुद्धा मदत करतात त्यांची शक्ति मोठी होत असते. हा फायदा देव मानणार्या माणसाच्या गणदेवांस होत नाही. असें असले तरी बरेच पितर अशावेळी त्यांना सहाय्य करतात त्यांचे चांगले काम तडीस जाते. गणदेव संतुष्ट असतात म्हणून त्याच्यामुळे जे फळ प्राप्त होते त्या बदल्यात ते कांहींही अपेक्षा करीत नसतात. आपल्या पूर्वजात जर कोणी असा गणदेव असेल तर तो त्या कुटूंबाला संरक्षण देत असतो. त्यासाठी त्याला पितृपक्षात पिंडदान करणे चांगले असते. जर कोणी अशारितीने आपल्या पूर्वज गणदेवांस पिंडदान करीत असेल तर इतर गणदेवसुद्धा तेथे जमतात म्हणून त्यांनासुद्धा पिंडदान करावे असा संकेत आहे. असे होण्याचे कारण, असें सांगतात किं, ह्या गणदेवांना अशा पिंडाची भूक असते. अशा सेवेमुळे हे गणदेव माणसांस त्याच्या जीवनात मदत करीत रहातात असे समजले जाते.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू
जसे हिणकसातील अशुद्ध पदार्थ भट्टीतून भाजून वेगळे करून धातु शुद्ध केला जातो तसेंच दीर्घ श्वासांने शरीरातील दोष नाहीसे होतोत. ७१
शरीरातील दोष दीर्घ श्वासाने नाहीसे करावेत, पाप सुक्ष्म निरीक्षणाने, वासना संयमाने, इतर हट्टी दोष ध्यानाने नाहीसे करावेत. ७२
ध्यानाच्या सवयीने तो स्वताची प्रगती ओळखू शकतो. महापाप्याला तसें ओळखता येत नाही. ७३
जो दीव्य दृष्टीने जगाची रीत ओळखतो त्याला कशाचेच बंधन नसते परंतू, ज्याला ती नसते तो जन्म मरणाच्या बंधनात अडकून पडतो. ७४
कोणत्याही प्राण्याला इजा करतां वासनेच्या बंधात अडकता वेदांचा अभ्यास करून आणि घोर तत्त्वशिलता आचरून तो ह्या जन्मात मोक्ष प्राप्त करू शकतो. ७५
ज्या घरात पांच पापे आहेत, जेथे हाडे घराच्या तुळ्या (वासे) असतात, त्या स्नायूच्या वाखांने बांधलेले असतात, जेथे मांस रक्त जोडण्याचे काम करतात, ज्यावर चामडी छपराचे काम करते, जेथे सुत्र मळाची दुर्घंधी असते, जे यथावकाश वृद्ध होते, जेथे दुःख असते, आजार, वेदना, नैराश्य असते आणि जे शेवटी नष्ट होते असें घर म्हणजे आपले शरीर त्याने त्याच्या मोहात पडून पकडून ठेवू नये. त्याने ते घर कायमचे सोडून द्यावे. ७६-७७
नदीच्या किनारी असलेला वृक्ष उन्मळून पडावा, झाडावर बसलेले पक्षी उडून जावेत, असे ह्या दुःख देणार्या जगातून तो निघून जातो. ७८
आपल्या मित्रांना आपले चांगले ते देऊन, वाईट तेवढे शत्रूला देऊन तो अनंत ब्रह्मात विलीन होतो. ७९
तो उदास वृत्तिने सर्व गोष्टींबद्दल त्रयस्थभावाने (प्रेमळ परकेपणाने) वागत रहातो. त्यातूनच त्याला अनंत सुख मिळते जे कधीही त्याला सोडत नाही. ८०
अशारितीने जो साधक अथवा बाधक ह्यांतून सावकाशपणे मुक्त होतो तो अखेरीस ब्रह्मात विलीन होतो. ८१
हे सर्व ध्यान साधनेवर अवलंबून असते. कारण, जो त्यात पटाईत नाही तो ह्यात पूर्ण फळ प्राप्त करू शकत नाही. ८२
तो सदैव वेदांतील यज्ञाबाबतच्या ऋचा वाचत राहील. देवतांबद्दलच्या ऋचा वाचत राहील आणि ज्यात आत्मा आणि वादांचा अभ्यास आहे ते वाचत राहील. ८३
वेदाचा अभ्यास, अज्ञानी लोकांपासून ज्ञानी लोकांपर्यंत तसेंच स्वर्गात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांपासून अनंत सुखाची इच्छा असलेले अशा सर्वांना उपयोगाचे आहे. ८४
द्विज ज्याने येथे दिल्या प्रमाणे वर्तन ठेवून सन्यस्त जीवन स्वीकारले आहे तो त्याच्या सर्व पाप फळांपासून मुक्त होऊन ब्रह्मांत विलीन होतो. ८५
अशारितीने स्वसंयमाचे नियम तुम्हाला सांगितले. आता ऐका, ज्याने वेदात दिलेले विधी करण्याचे सोडून दिले आहे त्यांनी काय करावयाचे. ८६
गृहस्थाच्या वर्गातून चार मार्ग उत्पन्न होतात. ते असें, विद्यार्थी, गृहस्थ, जोगी संन्यासी आहेत. ८७
ह्या चार मार्गातील कोणत्याही मार्गाने जाणारा शेवटी पवित्र नियमांचे (खाली दिलेले) पालन करील तो ब्राह्मण अति उच्च स्थानी पोहोचेल. ८८
वेदांत स्मृतित दिल्याप्रमाणे, घर चालवणारा गृहस्थ त्या चारांत सर्वश्रेष्ठ असतो. ८९
जसें लहान मोठ्या नद्या शेवटी समुद्राला येऊन मिळतात तसेंच हे सर्व चार मार्ग चोखाळणारे शेवटी घर चालवणार्या गृहस्थास मिळतात.


मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.