सोमवार, २० मार्च, २०१७

हिंदू कोण – १८

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
२९. देवांची पुजा करणे हे सर्वच धर्मांत असते. हिंदूसुद्धा आपल्या देवांची विविध प्रकारे पुजा करतात. वेदांतील माहितीनुसार प्रथम श्राद्ध करण्याची पद्धत होती. वेदांत आदिदैवतांचे म्हणजे पितरांचे श्राद्ध दररोज करण्याचा प्रघात होता. ह्या श्राद्धाचे सामान्य पुजेत रुपांतर कालांतराने झाले त्याचे कारण, श्राद्धविधी करण्यासाठी वेदशास्त्र संपन्न (श्रोत्री) असा ब्राह्मण आवश्यक असें. जसें कालांतराने असें ब्राह्मण मिळणे दुरापास्त झाले तसें श्राद्धाची जागा साध्या पुजेने घेतली कारण, अशी पुजा करण्यास वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाची गरज नसते. देवाबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी माणूस पुजा करतो. श्राद्ध पुजा ह्यातील मोठा फरक असा असतो किं, श्राद्ध करतांना देवतेची प्रतिमा अथवा मूर्ति (अभिव्यक्ति) आवश्यक नसते. पुजा करण्यासाठी मात्र अशी कांही अभिव्यक्ति आवश्यक असते. त्या अभिव्यक्ति पुढे भक्त, पुजाविधी करत असतो. सुरुवातीला माणसांने साधा दगड, देवाची अभिव्यक्ति म्हणून वापरावयास प्रारंभ केला. त्याला पाषाणपुजा असें म्हणतात. शिवलिंग हे पाषाणपुजेचे उदाहरण आहे. त्याशिवाय आपण अनेक पाषाण त्याला शेंदूर फासून लाल किंवा चुना फासून सफेद रंग देऊन पुजण्यासाठी वापरण्यात असल्याचे पाहतो. असा दगड आजुबाजूच्या इतर दगडांपेक्षा वेगळा असावा ह्यासाठी असे करावे लागत असें. लिंग ह्या शब्दाचा अर्थ आहे चिन्ह. म्हणजे शिवलिंग म्हणजे शिवाचे चिन्ह असा आहे, पुलिंग म्हणजे पुरुषाचे चिन्ह, स्त्रीलिंग म्हणजे स्त्रीचे चिन्ह अशाप्रकारे. आज मात्र लिंग ह्या शब्दाचा दुसरा अर्थ, प्रजनन इंद्रिय, हा जास्त प्रचारात असल्यामुळे शिवलिंग ह्या शब्दाबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत. शाळुंखी स्त्रीच्या योनी सारखी दिसते म्हणून शिवलिंग हे स्त्री-पुरुष संभोगाचे द्योतक असा व्यभिचारी अर्थ भ्रष्ट ब्राह्मणांनी काढून पाश्र्चात्य पंडितांची, हिंदू विचारांची खिल्ली उडवण्यास मदत केली. निर्बुद्ध ब्राह्मणांच्या अशा कारवायांमुळे हिंदू विचारांची जगात नाहक नाचक्की झाली, आणि अल्पमती अशिक्षित हिंदू सभ्रमात गेला.
श्राद्धात अर्ध्य देत त्याची जागा अभिषेकाने घेतली. पुजा करतांना त्या देवाची अभिव्यक्ति असलेल्या पाषाणावर पाणी सोडले जाते. ते त्या पाषाणावरून वाहत खाली जमिनीवर सर्वत्र पसरल्याने ती जागा अस्वस्थ होत असें. ते होऊ नये म्हणून तो पाषाण जमिनीवर जेथे बसवला आहे त्या ठिकाणी, अभिषेकाचे पाणी गोळा करण्यासाठी त्या पाषाणाभोवती एक कालवा तयार केला गेला, त्या कालव्याला शेवटी एक वाट काढलेली असते. अशा व्यवस्थेमुळे अभिषेकाचे पाणी त्या वाटेने एका जागी गोळा करता येऊ लागले जागा अस्वस्त होण्याचे बंद झाले. ह्या व्यवस्थेला आज आपण शाळुंखी असें म्हणतो, शाळुंखीत बसवलेल्या पाषाणाला बाण असें म्हणतात. बाण शाळुंखी मिळून पिंडी बनते. अशारितीने पाषाण पुजेतून शिवलिंगाची पुजा सुरु झाली. असे अनेक पाषाण आज ठिकठिकाणी पुजले जात आहेत. मुसलमान लोक मक्केत जो काबा पुजतात तो असाच एक पाषाण आहे. शिंगणापुरात जो शनिचा पाषाण पुजला जात आहे तोसुद्धा असांच एक प्राचीन पाषाण पुजेचा प्रकार आहे. अनेक पाषाण लाल रंग लावून देवीची मूर्ति म्हणून आज पुजले जात आहेत. ही झाली पाषाणपुजेची उदाहरणे. म्हणजे मूर्तिपुजेची सुरुवात पाषाणपुजेतून झाली. हे पाषाण म्हणजे तो देव असं हिंदू कधीच समजत नाहीत. हे दगड अथवा मूर्ति हे केवळ चिन्हात्मक असतात. त्यात देव पहाण्याचा प्रयत्न भाविक करीत असतो एवढेंच. आपल्या घरांत आपल्या प्रियजनांचे फोटो तसबीरीत घालून भिंतीवर टांगतो ते सुद्धा असेंच चिन्हात्मक असते. त्या फोटोत आपले प्रियजन आहेत असें समजण्याचा मूर्खपणा कधींच कोणीही करीत नाही.
क्रमशः चालू -
मनुस्मृती सातवा भाग सुरू ४१ ६०
मग्रुरीमुळे मोठे मोठे राजे लयास गेले आहेत जसें, वेण, नहुष, सुदास, पिंगवाचा मुलगा, नेमी. ४१
केवळ नम्रतेमुळे पृथु आणि मनु अधिकारात आले. कुबेर ऐहीक संपत्तीचा देव बनला आणि गधीचा मुलगा ब्राह्मणपदाला पोहोचला. ४२
तीनही वेदांत पारंगत असलेल्या पंडीतांकडून तो शिकला, पवित्र शास्त्रे, राजपाट शास्त्र, भाषातर्क शास्त्र, अध्यात्म आणि विविध उद्योग, व्यापाराचे नियम, ४३
सदैव तो भोग इंद्रीयांचे संयमन करील कारण, असें करणार्या राजाची प्रजा त्याचा आदर करते तो तिचे पालन उत्तम प्रकारे करू शकतो. ४४
संयमाने जगणार्या राजाने कामातून उत्पन्न होणारे दहा विकार आणि आठ विकार जे क्रोधामुळे उद्धवतात ज्यामुळे दुःख मिळते, ते त्याने टाळावेत. ४५
कामातून उद्धवळारे विकार त्याची संपत्ती पुण्य नष्ट करतात क्रोधामुळे आयुष्य कमी होते. ४६
शिकारीला जास्त जाणे, द्युत खेळणे, दिवसा झोपणे, अतिरेकी प्रवृत्ती, स्त्री लंपटपणा, मद्यपान, नृत्याचा छंद, गाणे बजावणे ह्यांत रमणे, विनाकारण भटकणे, असें कामातून उत्पन्न होणारे दहा विकार आहेत ते त्यांने टाळावेत. ४७
हेत्वारोप करणे, हिंसा, विश्वासघात, द्वेष, अपमान असें करण्याची सवय, अवैधरित्या दुसर्याची मालमत्ता हडप करणे, उद्धटपणा, विनाकारण हल्ला करून त्रास देणे हे आठ विकार क्रोधामुळे उत्पन्न होतात. ४८
लोभीपणा ज्यामुळे हे सर्व होण्याची शक्यता असतें. त्या लोभावर त्यांनी मात करावयाची असते. ४९
कामदोषातून उत्पन्न होणार्या दोषांत मद्यपान, द्युत, बाई, मृगया, ज्यांचा उल्लेख झाला आहे ते फारच भयंकर असतात. ५०
विनाकारण हल्ला करणे, हेत्वारोप, अवैधरित्या दुसर्याची मालमत्ता हडप करणे हे क्रोधातून उत्पन्न होणारे विकार फारच भयंकर समजावेत. ५१
संयमी राजाने ह्या येथे दिलेल्या सात विकारांपासून जपावे. त्यांच्या भयंकरपणाची तीव्रतेचा क्रम उतरत्या श्रेणीने आहेत हेसुद्धा लक्षात ठेवावे. ५२
व्यसन आणि मृत्यू ह्यांत व्यसन जास्त घातक असते. कारण, व्यसनाने माणूस अगदी खालच्या पातळीच्या नरकांत जातो जो माणूस निर्व्यसनी मरतो तो निश्चितपणे स्वर्गात जातो. ५३
राजाने सात अथवा आठ मंत्री नेमावेत. ते लोक असें असतील किं, त्यांचे पूर्वजसुद्धा राजपट चालवित होते. सर्व शास्त्रात आणि शस्त्रात प्रवीण असावेत आणि असें ज्यांच्यावर राजा भरवसा करू शकेल. ५४
एकादा साधा उपक्रम (कारभार) चालवण्यासाठी सुद्धा एका माणसाला किती त्रास होतो असें असतां राजपाट चालवणे किती अवघड हे सांगावयांस नको. विशेषकरून जेथे मोठा राजस्व (करांचा महसुल) आहे. ५५
तो दररोज त्याच्या सल्लागारांशी (ब्राह्मणांशी) सल्ला मसलत करून शांततेतील युद्धाच्या प्रसंगी डावपेंचांची चर्चा करील. त्यात येणार्या बाबी अशा, स्थान, राजस्व (कराच्या महसुलाबाबत), स्वताचे राज्याचे संरक्षण, सेवकांचे भवितव्य, राजाच्या उत्पन्नाचे वितरण पुण्यमार्गांने कसे होईल. ५६ टीपः ह्यांना राजाच्या सहा मुलभूत जबाबदार्या असे म्हणतात. ह्यांत विकासाचा मुद्दा नाही, तो आजचे शासन करीत आहे.
प्रथम तो सामान्य कामाची चर्चा त्याच्या मंत्र्यांबरोबर एकटे घेऊन मग सर्वांना एकत्र घेऊन त्यांची मते अजमावेल. शेवटी सारासार विचार करून अंतिम निर्णय स्वतः घेईल. ५७
जास्त महत्वाच्या कामांची चर्चा तो खास प्राविण्य असलेल्या प्रधान मंत्र्याशी करील. त्यातून राजाचे धोरण काय ते ठरेल. ५८
पूर्ण विचाराअंती तो राजा नियुक्त केलेल्या अधिकार्यांच्या कडे ती कामे त्याप्रमाणे करण्याचे आदेश देईल. ५९

राजा जनतेतून चांगली कर्तबगार माणसे निवडून त्यांना शिकवून (ब्राह्मणांच्या मदतीने), त्यांच्या प्रामाणिकपणाची पारख करून कामाला लावील. ते असें असतील किं ते राजस्व गोळा करू शकतील. ६०
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com
आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.