शनिवार, २९ एप्रिल, २०१७

हिंदू कोण - २२

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
पुजेतील आठ विधी येथे दिल्या आहेत तशा असतात

, आमंत्रण,
. स्वागत,
. बसण्यास आसन देणे,
. स्तुती करणे,
. प्रसाद देणे,
. प्रसाद सेवन करत असतांना त्या देवतेच्या कार्याचे कौतुक, वहाव्हा करणे,
. आराम म्हणजे थोडावेळ शांतता पाळणे, पुजेत जे मागावयाचे ते मागणे.
. शेवटचा विधी पाहुण्याचे प्रस्थान अथवा निघून जाणे. शेवटची आरती करणे.
अशा आठ गोष्टींनी ही क्रिया होत असते. कोणत्याही देवतेची पुजा करतांना ह्याच सर्व गोष्टी कराव्या लागतात. ह्यांतील , , , , क्रियांत देवतेची विविध प्रकारे स्तुती केली जाते. मध्ये देवतेला बसण्याचे आवाहन केते जाते त्यात त्या देवतेच्या सामर्थ्याचा उल्लेख करावयाचा असतो. मध्ये शांतता पाळली जाते. मध्ये आरती ओवाळली जाते. ह्या क्रिया किती वाढवायच्या ते पुरोहित ठरवत असतो. ऋग्वेदात ह्या सर्व विधी थोडक्यात उरकण्याचा प्रघात होता, त्यात मोठा बदल शुक्ल यजुर्वेदाच्या काळात झाला आणि पुजाविधी खूपच लांबलचक केला गेला. त्याचा फायदा पुरोहित वर्गांस झाला. पुजाविधी सुंदर व्हावा म्हणून आसनाची जागा सुशोभित करणे, त्यासाठी आरास सजावट असें बरेच कांहीं करण्याची प्रथा सुरू झाली. कांहीं देवता एकट्या येत नाहीत त्यांच्या बरोबर त्यांचा सहकार्यांचा (त्यांना गण असें म्हणतात) लवाजमा येत असतो. त्यासाठी अशा देवतेची पुजा करतांना त्या सर्व उपदेवतांचीसुद्धा व्यवस्था करावी लागते. अशाकरणांने पुजाविधी अधिक व्यापक होतो. मुख्यदेवतेसाठी समजा, मूर्ति, कलश अथवा तसबीर ठेवली असेल तर उपदेवतांसाठी बहुधा सुपारी चिन्हात्मक म्हणून योजली जाते. अशा सुपार्या ठेवण्यासाठी नागवेलीचे (विड्याचे) पान त्यांचे आसन म्हणून बहुधा वापरतात. पाहुण्यास घरात प्रवेश देतांना आपण त्याच्या कपाळाला कुंकुम तिलक करतो हार घालतो तसेंच देवतेच्या मूर्तिस, कलश अथवा तसबीरीस गंध, कुंकू, इत्यादि लावावयाचे असते फुले, गजरा, माळा इत्यादि घालावयाचे असतात. पाहुणा मोठा आसामी असेल तर धुपारती, अत्तर शिंपणे, थाळी वाजवून शंखनाद करून आनंद व्यक्त करणे असे अनेक प्रकार पुरोहिताच्या सांगण्यानुसार होत असतात. उपदेवतांच्या करतां ज्या सुपार्या ठेवलेल्या असतात त्यांनासुद्धा गंध, कुंकू, इत्यादि लावले जाते. त्यानंतर प्रत्येक उपदेवतेचीसुद्धा स्तुती करून त्यांचे स्वागत करावयाचे असते. अशारितीने हा पुजा करण्याचा कार्यक्रम पाहिजे तेवढा फुगवता येतो. तेंच शुक्ल यजुर्वेदाच्या काळात झाले. देवतेचे सर्वच उपदेवतास्वरूप सेवक बोलवता येत नाहीत म्हणून उरलेल्यांची क्षमायाचना त्या पुजेच्या विधीत अंतर्भूत केली जाते. किंवा त्याच्या चिन्हात्मक म्हणून एक नारळ योजला जातो. निरनिराळ्या देवतांच्या स्वभावगुणांनुसार ह्या पुजांचे स्वरूप वेगवेगळे ठरत असते. ही पुजेची पद्धत पाहिजे तेवढी पुरोहित वाढवून जास्त दक्षिणा यजमानाकडून मिळवत असें. अशा पुजा करणे सामान्य हिंदूस शक्य नसते म्हणून पुजारी बोलवावा लागतो. अशा पुजा बहुधा राजस् तमस् प्रकारात मोडतात. पुजेचा मुख्य उद्देश त्या देवतेस शांत संतुष्ट करण्याचाच असतो. शांत झालेली देवता प्रसन्न होते असें समजले जाते. ब्राह्मण पुरोहितांना त्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अनेक पोथ्या लिहील्या गेल्या आहेत.
क्रमशः चालू –
मनुस्मृती सातवा भाग सुरू – ११६ – १३५
पाटील त्याच्या गांवाची हालहवाल त्याच्या वरिष्ठास म्हणजे मामलेतदारास देईल, मामलेतदार कुलकर्ण्यास देईल, कुलकर्णी ठाकूरास व ठाकूर देसांयास कळवील. ११६-११७
लोकांकडून जे राजाला मिळाले पाहिजे ते त्या गांवाचा प्रमुख गांवकर्यांकडून गोळा करील व वरच्या अधिकार्याकडे देईल. खाद्य, पाणी, जळण, अशा त्या गोष्टी असतील. ११८
दहा गांवाच्या प्रमुखास त्याच्या कुटूंबास पुरेल इतकी जमीन (कुल) राजा त्याला वतन म्हणून देईल. वीस गावांच्या प्रमुखास पांच कुल जमीन त्याचे वतन म्हणून राजा देईल. शंभर गांवांच्या प्रमुखास एक गांव इनाम म्हणून राजा देईल. हजार गांवांच्या प्रमुखास एक नगर मिळेल. ११९ टीपः म्हणजे त्या वतनात येणार्या गांवांतील लोकांवर कर लादण्याचा व तो वसुल करण्याचा हक्क त्या वतनदारांस असेल. त्यासाठी त्यांना शिपाई संरक्षक दल सांभाळता येईल व प्रसंगी ते शिपाई राजाला त्याच्या कामासाठी वापरता येतील.
अशारितीने नेमलेले प्रमुख कसे काम करतात त्यावर लक्ष ठेवणारा एक अधिकारी अमात्य राजा नेमेल व तो अमात्य त्याचे काम चोख बजावेल. १२०
प्रत्येक नगरात तो राजा, एक निरीक्षक नेमेल, तो उच्चपदाचा मानकरी असेल. असा अधिकारी त्याच्या करड्या नजरेंने सर्व कामावर लक्ष ठेवून असेल. १२१
तो उच्चपदांचा मानकरी स्वतः त्याच्या हाताखालील अधिकार्यांना वेळोवेळी भेटेल आणि सर्व काम व्यवस्थितपणे होत आहे कां नाही त्याची मोजदाद ठेवील. त्यासाठी प्रसंगी गुप्त हेर, खबरे त्याला माहिती पुरवतील. १२२
बर्याच प्रसंगी असें नेमलेले अधिकारी स्वताच प्रजेच्या मालमत्तेचे अपहरण करतात, त्यासाठी राजाला त्यांच्यावर लक्ष द्यावयाचे असते व प्रजेच्या हक्कांचे संरक्षण करावयाचे असते. १२३
असा अधिकारी जर सांपडला तर राजा त्याची सर्व मालमत्ता जप्त करील व त्याची हकालपट्टी करील. तक्रार करणार्याला त्याची मिळकत परत केली जाईल. १२४
राजवाड्यात सेवा करणार्या कर्मचार्यांस ज्यांत महिलासुद्धा असतील, त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे वेतन मिळेल. १२५
सर्वात खालच्या दर्जाच्या सेवकास एक पना दररोज असा पगार मिळेल, दर सहा महिन्याला एक वस्त्र मिळेल, दर महिन्याला एक गोणभर धान्य मिळेल. १२६ टीपः पना हे प्राचीन नाणे आहे.
खरेदी व विक्री ह्यांचे दर ठरविल्यानंतर, त्या गोष्टांच्या मुल्यानुसार राजा व्यापार्याकडून कर वसुल करील. १२७
सर्व गोष्टींचा सारासार विचार करून राजा अशा प्रकारे कर आकारणी ठेवील किं, संबंधित लोकांवर अन्याय होणार नाही. १२८
जसें गोचंडी वासराचे रक्त थोडे थोडे असें चोखते किं त्याचा त्रास त्या वासराला होत नाही त्या प्रमाणे सर्व कर असावेत. म्हणजे ते देतांना प्रजेला, व्यापार्यांना त्रास होणार नाही. १२९
गोधन व सोने ह्यांच्या वाढीच्या (फायद्याच्या) पन्नासावा भाग कर म्हणून घ्यावा. धान्याच्या वाढीच्या सहावा अथवा आठवा हिस्सा कर म्हणून घ्यावा. १३०
झाडे, मांस विक्री, मध, साजूक तुप, अत्तरे, औषधी जडीबुट्टी, खाद्यापदार्थांना सुगंध देणारे, फुल, कंदमुळं, फळे इत्यादी मालांवरसुद्धा राजा कर आकारू शकतो. १३१
खाण्याची पानं, भाज्या, गवत, बांबू, त्यांपासून बनवलेल्या वस्तु, मातीची भांडी, अशा इतर गोष्टींवर तो राजा कर आकारू शकतो. १३२
कितीही वाईट परिस्थिती झाली तरी राजा ब्राह्मणांवर कर आकारणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मण उपाशी रहाणार नाही ह्याची दक्षता राजा बाळगेल. १३३
ज्या राज्यात ब्राह्मण उपाशी असतो त्या राज्यात दुष्काळ पडतो. १३४
त्या ब्राह्मणाचे वेदांचे ज्ञान व इतर वर्तन लक्षात घेऊन राजा त्याच्या योग्यतेनुसार उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देईल. त्याचे पवित्र नियमाप्रमाणे, संरक्षण करील. जसा बाप आपल्या चांगल्या मुलाचे पालन करतो. १३५

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

हिंदू कोण – २१

. हिंदूंतील पुजा करण्याच्या पद्धती
क्रमशः चालू
जैनांच्या प्रभावाखाली ब्राह्मण, आदि शंकराचार्याच्या काळात, आले त्यामुळे ते अर्ध शाकाहारी झाले. एवढेच नव्हे तर हिंदूंनासुद्धा निरनिराळ्या वारी शाकाहार करण्याचा आग्रह करू लागले. वस्तुतः एकाद्या वारी कां शाकाहार करावयाचा ह्याचे कोणतेही पटण्यासारखे कारण मात्र सापडत नाही. परंतु अशिक्षित हिंदू समाज ब्राह्मणांच्या चुकीच्या खोडसाळ मार्गदर्शनाखाली तसें विनातक्रार करीत असतो. आता परिस्थिती बदलत आहे. हिंदू प्रश्र्न विचारू लागले आहेत. त्यांना अशा अनेक निरर्थक चालींचा पुनर्विचार करावा लागणार आहे. वस्तुतः हिंदूंच्या सर्व देवता मांसाहारी आहेत म्हणूनच वेदांत शाक्तांच्या आणि अघोर तंत्रात सर्वत्र मांसाचाच प्रसाद देण्याचे संकेत आहेत. मनुस्मृतीत पितरांच्या नैवेद्यात शाकाहारी प्रसाद निकृष्ट ठरवलेला आहे मांस आणि मांसळीचे प्रसाद उत्तम म्हणून सांगितलेले आहेत. आपल्या येथील शाकाहारी, अर्ध शाकाहारी आहेत असे म्हणण्याचे कारण, ते सर्व लोक दुध त्यापासून बनणारे अनेक खाद्य पदार्थ त्याच्या आहारात ठेवतात. दुध हे गाईपासून तिच्या रक्तातून बनत असल्याने तो गोमांसाहार ठरतो. एक लिटर दूध हे दोनशे ग्राम गोमांसा इतके असते. म्हणजे त्यावरून हे शाकाहारी लोक दिवसाला किती गोमांस खातात ते समजू शकते. ह्यांत जैन धर्माचे लोकसुद्धा येतात. त्यामुळे शाकाहार हा केवळ मिथ्याचार ठरतो. मनुस्मृतीच्या आदेशानुसार ब्राह्मणांनी गोमांस खाणे शिष्टसंमत आहे असे असले तरी आज हे लोक शाकाहाराची भलामण करतांना दिसतात मांसाहाराचा द्वेष करतात. हे वागणे पवित्र नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे मनुस्मृतीच्या आदेशानुसार पाहिले तर आजचे ब्राह्मण शूद्र ठरतात. हिंदूंतील सनातन धर्माची व्याख्या अशी आहे किं, मनुस्मृतीच्या पवित्र नियमानुसार वागणारा तो सनातनी. हे पहातां आजचे ब्राह्मण सनातनी नाहीत, आणि वैदिकही राहीलेले नाहीत. तरी ते सनातन धर्माच्या वैदिकतेच्या गोष्टी करीत असतात. एकापरीने पाहिले तर असे दिसते किं, हे ब्राह्मण जैन धर्माचेच छुप्या रीतीने पालन करतात.

३४. पुजा करण्याच्या पद्धतीत जे मुख्य सुत्र असते ते आपण पहावयाचे आहे. पुजा करण्याचे साम्य असते त्या विधीशी, जेव्हा आपण एकाद्या सन्माननीय पाहुण्याचे घरात स्वागत करतो. त्या स्वागत सोहळ्यात ज्या कांहीं मुलभूत गोष्टी केल्या जातात त्यासर्व देवाच्या पुजेत होत असतात. पुजा करण्याचा कांहीं उद्देश असतो. सामान्य माणसाच्या पुजा सकाम असतात. त्याबद्दल विनवणी करणे हे महत्वाचे काम देवतेला प्रसाद दिल्यानंतर करावयाचे असते. पुजाविधीचा क्रम असा असतो. कांही चुक झाली, कांहीं राहून गेले असल्याल त्या बद्दल माफी मागणे हे शेवटच्या विधीत करावयांस विसरता कामा नये. पुजेतील आठ विधी येथे दिल्या आहेत तशा असतात
क्रमशः चालू –
मनुस्मृती सातवा भाग सुरू – १०१ – ११५
जे राज्य त्याला मिळालेले नाही ते तो त्याच्या सैन्याच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करील. ते प्राप्त झाले आहे ते तो राजा संरक्षित करील, जे संरक्षित झाले आहे ते तो वाढवेल. त्याचा योग्य मंत्र्यांच्या मदतीने विकास करील. ज्यांचा विकास झाला आहे ते तो पुढील व्यवस्थेसाठी सत्पात्र लोकांच्या हातात सुपूर्द करील. १०१
राजा सदैव त्याची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करील. तो त्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करील. तो स्वताचे दोष उघड होऊ देणार नाही. परंतु, शत्रूचे दोष उघड करण्याचा, शोधून काढण्याचा, प्रयास करील. १०२
जो हल्ला करण्यास नेहमी तयार असतो त्याला जग घाबरते, म्हणून राजा सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमते ठेवण्यासाठी सैन्याचा वापर करील. १०३
तो राजा नेहमी दक्ष राहील, विश्र्वासघाताचे सर्व प्रयोग तपासून काम करील. चटकन कोणावरही भाबडेपणाने भरोसा करणार नाही. शत्रूच्या गुप्त कारवायांवर त्याची करडी नजर असेल. १०४
त्याच्या शत्रूस त्याचे दोष समजणार नाहीत अशी दक्षता त्यांने व त्यांच्या आमात्याने घ्यावयाची असते, त्या उलट शत्रूचे दोष हुडकण्याचे प्रयास सदैव असला पाहिजे. १०५
बगळ्याप्रमाणे (लुच्चेपणे) तो ध्यानस्थ राहून सर्व गोष्टींचे निरीक्षण करील, सिंहासारखा हल्ला करील, कोल्ह्यासारखा सावज प्रसंगी चोरून घेऊल आणि सशासारखा (प्रसंग पाहून) पळून जाईल. १०६ टीपः हार पत्करण्यापेक्षा पळणे चांगले असे धोरण.
जेव्हां तो जिंकण्यासाठी स्वारीवर निघेल तेव्हां तो सर्व प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारील. त्यासाठी तो चार युक्त्या उपयोगात आणील. त्यासाठी तो मंत्र्यांचा सल्ला घेईल. १०७ टीपः साम, दाम, भेद व दंड अशा त्या चार युक्त्या आहेत.
पहिल्या तिनानी काम केले नाही तर अखेरीस तो शेवटचा म्हणजे दंड अथवा युद्धाचा मार्ग अवलंबेल. १०८
चार युक्त्यापैकीं सामचा वापर प्रथम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. दंडाचा सर्वात शेवटी असतो. राज्याच्या भल्यासाठी हे धोरण उत्तम समजले आहे. १०९
शेतात जसें तण काढले जाते पण धान्याचे पीक ठेवले जाते तसेंच राज्याच्या भल्यासाठी विरोधकांचा नाश केला जातो. इतर चांगली उपयोगाची माणसे सुरक्षित असतात. ११०
जो राजा मूर्खपणे प्रजेचा छळ करतो तो लवकरच स्वताच्या व त्याच्या सत्तेचा र्हास करत असतो. १११
जसें शरीराच्या छळांने प्राणाचा नाश होतो तसेंच प्रजेच्या छळाने राजाचासुद्धा नाश होतो. ११२
राज्याचा उद्धार व्हावा असें राजाला वाटत असेल तर त्यांने येथे दिलेले नियम पाळावेत. ११३
दोन, तीन पांच किंवा शंभर गावांसाठी राजाने सैन्य तैनात ठेवावी. त्या सैन्याचा प्रमुख राजाशी प्रामाणिक असला पाहिजे. ११४
राजाने प्रत्येक गांवासाठी एक पाटील नेमावयाचा असतो, दहा गांवांसाठी मामलेतदार, वीस गांवांसाठी कुलकर्णी, शंभर गांवांसाठी ठाकूर, हजार गांवांसाठी देसाई नेमावेत. ११५ टीपः ही व्यवस्था संरक्षणासाठी असते. महसुल (कर) गोळा करण्यासाठी खोत नेमावयाचे असतात.

मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.