बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

हिंदू कोण – ३३

मागील भागातून पुढे
. चार वर्णांची माहिती - पुढे चालू
तिसरा वर्ण आहे वैश्यवर्ण. वैश्यवर्णाचा पुरुष व्यवसाय, धंदा, शेती अशी कामे करून जगतो समाजाची अर्थ व्यवस्था ते सांभाळतात. वैदिक काळाती ब्राह्मण काळातील वैश्यांत कांहींही फरक आढळत नाही. आपली कामे करण्यासाठी जेवढी बुद्धि आवश्यक असते तेवढी बुद्धि त्यांच्याकडे असते. व्यवहार चातुर्य ज्याला हल्ली स्मार्टपणा म्हणतात तो ह्या वैश्यात भरपूर असतो. चतुराई (स्मार्टपणा) हा वैश्याचा मुख्य गुण असतो. नेहमी फायद्यात रहाणे हा वैश्याचा अतिम उद्देश असावा लागतो. कलीयुगातील वैश्य समाजातील बरेच लोक स्वताला ब्राह्मण सांगतात त्याचा व्यावसायिक फायदा उचलतात. गौडसारस्वत (शेणवी), दैवज्ञ, कुडाळदेशकर अशी कांहीं महाराष्ट्रातील उदाहरणे आहेत.
ह्या तीन वर्णांना द्विज म्हणून एकत्र सांगितले जाते. म्हणजे ते प्रसंगी एकमेकांची कामे करू शकतात.
शेवटचा वर्ण आहे शुद्रवर्ण. ज्याला वर दिलेली कोणतीही कामे स्वतःच्या हुशारीने करता येत नाहीत असा पुरुष शुद्र समजला जातो. तो निर्णय घेण्यास असमर्थ असतो, त्याला आत्मविश्र्वास कमी असतो. शुद्र पुरुष त्यामुळे सेवकांचे काम करतो. वैदिक काळात असें जरी प्रथमदर्शनी सांगितले जात असले तरी ब्राह्मणकाळात स्वतःला ब्राह्मण म्हणून उच्च समजणारे समाजातील श्रेष्ठी महाजन मंडळी ह्यांच्या रोषाला बळी पडलेले त्यांचे विरोधी असें अनेक लोक, जे वस्तुतः जन्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होते, तरी ते श्रेष्ठींच्या आज्ञेने शुद्र ठरवले गेले. त्यांच्यावर बहिष्कार, देशाबाहेर हकलवणे असें अनेक अत्याचार झाले. असे खोटे शुद्र, खोटे म्हणण्याचे कारण, ते लोक कर्तृत्ववान असूनही शुद्र ठरवले गेल्यामुळे, आपल्या हक्कास मुकलेले होते. ब्राह्मण काळात हे फार झाले समाज व्यवस्था बिघडली आणि हिंदू समाजव्यवस्था उध्वस्थ झाली. जसें कर्तृत्ववान लोक शुद्र ठरवले गेले तसेंच कांहीं नालायक लोक केवळ वशिल्याने लायकी नसतांना ब्राह्मण क्षत्रिय जातीत गणले जाऊ लागले.
आज हिंदूस्थानातील अनेक शुद्र जाती मुळचे क्षत्रिय असल्याचे संशोधनानंतर सिद्ध झाले आहे. दोन हजार वर्षापेक्षा जास्त काळ होत असलेल्या अशा गैरव्यवहारामुळे हिंदू समाज आज विषण्णावस्थेत गेला आहे. खर्या हिंदूंना ब्राह्मणाच्या जोखंडातून मुक्त होण्याची आज नितात गरज आहे असे दिसते.
४९. अशारितीने क्षत्रियांचा केवळ आकसांने ब्राह्मण जातीतील लोकांनी नाश केल्यामुळे जेव्हां मुसलमान आक्रमण झाले तेव्हां क्षत्रिय लोक लढण्यासाठी नसल्यामुळे हिंदूस्थान पराजित झाला मुसुलमानांच्या गुलामगिरीत अडकला. सिकंदराच्या वेळी क्षत्रिय होते म्हणून तेव्हा सिकंदर भारतात येऊ शकला नाही हा इतिहास आहे. बहिष्कार टाकलेले अनेक क्षत्रिय समाज, नंतर मुसलमान झाले. असें बाटलेले क्षत्रिय ब्राह्मणप्रणित हिंदू समाजावर राग काढू लागल्याची अनेक उदाहरणे इतिहासात पहावयास मिळतात. वर्ण व्यवस्था जन्माने केल्यामुळे असें बरेच तोटे झाल्याचे आपण पहातो. हिंदूंच्या नाशांस हे ब्राह्मण धर्मी जबाबदार आहेत हे मान्य करावे लागते.
५०. वर्ण व्यवस्था जन्माने केल्यामुळे कांहीं फायदेसुद्धा झाले ते सुद्धा पहावे लागतील. जन्माने वर्ण म्हणजे जात ठरविल्यामुळे गुणी लोकांच्यात "निवडक प्रजनन" होऊ लागले. त्यामुळे अतिशय प्रखर बुद्धिमत्ता असलेले, उत्कृष्ट कसब असलेले, सौंदर्यवान अशा जाती वरच्या वर्गांत तयार झाल्या त्यामुळे त्या हिंदू समाजाची गुणवत्ता सुधारली. हे असें होत असतांना त्याचवेळी निकृष्ट बुद्धिमत्ता असलेला, कोणतीही गुणवत्ता नसलेला, विद्रुप असा एक वर्गसुद्धा वाढत गेला. आज हिंदूंत एकतर उत्तम गुण असलेले मिळतात त्यांची संख्या कमी असते दुसर्या बाजूस गुणहीन असा संख्येने जास्त असलेला समाज वाढत असलेला दिसतो आहे. ह्याचे कारण उत्तम गुणी स्वाभाविकपणे कुटुंब नियोजन करतात गुणहीन मात्र तसे करीत नाहीत. "निवडक प्रजनन" ही पद्धत उत्तम दूध देणार्या गाई, जास्त अंडी देणार्या कोंबड्या, चवदार मांस देणार्या लवकर वाढणार्या शेळ्या, उत्तम लोकर देणार्या मेंढ्या तयार करण्यासाठी हल्ली वापरली जाते.
क्रमशः पुढे चालू
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू -८०
अशावेळी न्यायाधीशाने एक गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्या साक्षी ग्राह्य मानाव्यात कारण, असें लोक, लहान मुलं, आजारी, प्रसंगी खोटी साक्ष देऊ शकतात. ७१
हत्येचा, चोरीचा, व्यभिचाराचा, बदनामीचा, मारामारीचा असें गुन्हे असतील तर साक्षीदाराच्या योग्यतेची फारशी दखल घेता त्याला स्वीकारावे. ७२
साक्षीदाराच्या साक्षीत फरक आढळून आला तर बहुसंख्यांचा कल काय आहे ते पाहून निर्णय घ्यावा. जर परस्पर विरोधी मतांचे प्रमाण समसमान झाले तर जास्त प्रतिष्ठीत साक्षीदारांच्या मताला झुकते माप द्यावे. प्रतिष्ठीतांत मते समसमान ठरली तर द्विजांचे मत विशेष ग्राह्य मानून न्याय द्यावा. ७३
प्रत्याक्ष दर्शी प्रत्यक्ष ऐकीव अशा साक्षी विशेष समजाव्यात, जो साक्षीदार खरी साक्ष देतो तो अध्यात्मिक सांपत्तिक दृष्ट्या फायद्यात रहातो. ७४
जो साक्षीदार सन्माननीय न्यायाधीश इतर आर्यांच्या पुढे खोटी साक्ष देतो तो त्याच्या मृत्यूनंतर नरकात खितपत पडतो. त्याला स्वर्गाची दारे बंद होतात. ७५ टीपः शाक्षीदार जेव्हां शपथ घेतो तेव्हां न्यायाधीश त्याले हे सांगेल.
साक्षीदार म्हणून घेतलेला इसम अचानकपणे उपस्थित झाला कांहीं सांगू लागला तर त्याचे ऐकावे. मात्र त्यांने सर्वकाही खरे सांगण्याचे शपथेवर मान्य केले पाहिजे. ७६
निस्वार्थी एका माणसाची साक्ष अनेक चांगल्या बायकांच्या साक्षीपेक्षा जास्त मोलाची समजावी कारण, बायकांची मनस्थिती सदैव अस्थिर असते, तरी ती साक्ष अनैतिक जीवन जगणार्यापेक्षा जास्त विश्र्वसनीय असते. ७७
जे साक्षीदार सहजपणे सांगतो ते खटल्यात महत्वाचे मानावे, जे अस्वस्थपणे सांगितले जाते ते न्यायदानाच्या दृष्टीने निरर्थक समजावे. ७८
खटल्यात साक्षीदार, दावेदार प्रतिवादी असें सर्व न्यायालयात जमल्यावर त्याची साक्ष कशी घ्यावी कोणत्या क्रमांने घ्यावी ते आता सांगतो. ७९
साक्षीदारांना न्यायाधीश आवाहन करील, तुम्ही सर्व येथे ह्या दोघांत जे काही झाले त्या बाबत सांगणार अहात, ते सर्व खरे आणि न्यायदानाच्या दृष्टीने सार्थकी होईल असें असले पाहिजे. त्यापुढे तो बोलेल, ८०
पुढे क्रमशः चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.