सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

हिंदू कोण – ४०

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
५९. प्रथम आपण हिंदूंच्या आहारा बाबत काय मार्गदर्शन आहे ते पहाणार आहोत. निसर्गाच्या रचनेवरून मनुष्य प्राणी उभय आहारी आहे असे दिसते. हे कसे ठरते ते पहावे लागेल. प्राण्याचा आहार त्याची दातांची रचना व पचनसंस्था कशी काम करते ह्यावर विसंबून असतो. माणसाच्या दातांची रचना त्यातील सुळे व दाढा पहाता, तसेंच त्याची पचन संस्था ज्या प्रकारे काम करते ते पहाता तो मांस व शाक असें दोनही खाणारा प्राणी आहे असें समजते. माणसाच्या आतड्यात जी जीवाणू संपदा (फ्लौरा फौना) असते तीसुद्धा विचारात घ्यावी लागते. माणसाचा शाकाहार व जनावरांचा शाकाहार ह्यांत एक फरक असतो, माणसाला बराचसा शाकाहारसुद्धा शिजवूनच करावा लागतो म्हणून तो पच्य शाकाहार ठरतो. न शिजवलेला कच्चा शाकाहार कमी असतो. इतर प्राणी कच्चा शाकाहार करीत असतात. ह्याचे कारण असें सांगतात किं, माणसाच्या आतड्यातील जीवाणू संपदा शाकाहारी प्राण्याच्या जीवाणू संपदेपेक्षा वेगळी असते. हिंदूनी निसर्गाच्या ह्या आदेशाचे पालन करावयाचे असते, म्हणजे उभय आहार केला पाहिजे. केवळ शाकाहार करणे म्हणजे निसर्गाचे आदेश मोडण्यासारखे, म्हणजे पाप ठरते. आज अज्ञानी माणूस भावनाविवशतेंने काल्पनिक तत्त्वज्ञानाच्या आहारी जाऊन हा निसर्गाचा उभय आहारी राहाण्याचा आदेश मोडीत काढतांना दिसतो. निसर्गाचे नियम न पाळणे हे पाप असें समजले तर निव्वळ शाकाहार करणे हेसुद्धा पापकर्म ठरते. आपण पृथ्वीच्या समशितोष्ण कटीबंधात असल्यामुळे आयुर्वेदा प्रमाणे आहार उभय रहाण्यासाठी पच्य शाकाहाराचा भाग ७० ते ८० टक्के ठेवावा व उरलेला मांसाहार असावा असें आहे. असे धोरण आहाराबाबत ठेवले तर माणसाची प्रकृती उत्तम रहाते असें समजले जाते. परंतु, शीत कटीबंधातील लोकांनी आहार ५० टक्के प्रती ठेवावा. आपल्या पचन क्रियेत आतड्यातील जैविक संपदा ज्याला इंग्रजीत फ्लौरा फौना म्हणतात, त्याचे संवर्धन होण्यासाठी आयुर्वेदात पंचामृताचा किंवा पंचारिष्टाचा उपयोग करण्याची शिफारस आहे. म्हणून खर्या हिंदूंनी दिवसातून एकदा तरी पंचामृताचे चाटण करावे. किंवा पंचारिष्टाची एक मात्रा आठवड्यातून दोनदा घ्यावी. त्यामुळे आतड्यातील जैविक संपदा संमृद्ध होते. आज काल अन्टीबायोटीकचा उपयोग फार होत आहे, त्यामुळे ही जैविक संपदा नष्ट होत असते त्यासाठी अशा प्रसंगी पंचामृताचे सेवन विशेष महत्वाचे ठरते. अशा बर्याच तरतुदी धर्माच्या पवित्र नियमांत केल्या जातात कारण, त्या धर्मात करण्याचे सांगितले किं, त्यांचे पालन इमाने इतबारे होत असते. एरवी माणसे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. ह्यासाठी धर्मातील विविध तरतुदीं मागील उद्देश समजून काम करणे चांगले असते. अनेक पुजाविधीत पंचामृताचे चाटण करण्याचे सांगितले आहे ते कां, ते समजू शकतो. दूध, दही, मध, तूप व साखर हे पांच घटक समप्रमाणात मिळून पंचामृत बनवले जाते. पंचारिष्ट बाजारत तयार मिळते ते घ्यावे. अशारितीने विज्ञानाने समृद्ध असा हिंदू विचार आम्हाला अभिप्रेत आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – १५१ -१६०
कर्जावरील व्याज (पैशाने) एकावेळी भरल्यास तें मुद्दलाच्या दुप्पट असणार नाही. परंतु, धान्य, फळं, लोकर, केस, जनावरे ह्यांच्या स्वरुपात भरल्यास ते पांचपटीपेक्षा जास्त नसेल. १५१
नियमांने आखून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्याज आकारल्यास त्या व्याजाला लुटमार अथवा चोरी व्याज असें समजले जाईल. तसें व्याज वसुल करतां येणार नाही. १५२
एक वर्षापेक्षा जास्त काळांचे व्याज एका वेळी घेता येणार नाही. अवैध पद्धतीने कर्जे जसें चक्रवाढ व्याज, मर्यादित काळाची, ठरलेल्या व्याजाची आणि शरीर श्रमाने वसुल करण्याची अशी कर्जे देणे गुन्हा आहे. १५३
जर ऋणको व्याज देण्यास समर्थ नाही असें सिद्ध झाले तर त्याला नवीन करार करून ते कर्ज पुढे चालवता येईल. १५४
जर तसें देणे त्याला शक्य नसेल तर ते व्याज नवीन करारात मुद्दलात समाविष्ट करून घेता येईल. परंतु, ते व्याज त्याला द्यावेच लागेल. १५५
चाकाच्या वाहनानें सामान विशिष्ठ ठिकाणी ठरलेल्या वेळात पोहोचावण्याचा करार केला व त्या ठिकाणी व त्या वेळांत तो ते सामान पोहोचवू शकला नाही तर त्याला ठरलेले पैसे मागता येणार नाहीत. १५६
पाण्यातून वाहतूक करणार्यासा कोठे, किती वेळात काय प्रकारचे सामान न्यावयाचे व त्यासाठी किती पैसे घ्यावयाचे ते चांगलेच माहीत असते त्याप्रमाणे, तो तसा आकार घेऊ शकतो. ते वैध ठरते. १५७
ऋणकोसाठी जो हमी रहातो त्याला जर ऋणकोने ते फेडले नाही तर ऋणकोचे कर्ज फेडावे लागेल. १५८
हमीदाराकडून हमी पूर्ण झाली नाही अथवा तोंच दिवाळीखोर ठरला पण तो जीवंत आहे असें तर त्याचे कर्ज व इतर भरपाई त्यांचा मुलगा देण्यास बांधलेला नाही. १५९
परंतु, जर हमीदार मेला तर मात्र त्या सर्व बाकीची भरपाई मुलाकडून वसुल करावयाची कां नाही ते न्यायाधीश ठरवेल त्या प्रमाणे होईल. १६०

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.   

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

हिंदू कोण – ३९

मागील भागातून पुढे
. सत्य, असत्य व हित, अहित ह्याचा पाप-पुण्य संबंधातील विचार –
ह्या उदाहरणात दोन हित उद्देश दिसतात. एक त्या स्त्रीचे हित व दुसरे त्या दोन धटिंगणांचे हित. धटिंगणांचा उद्देश स्पष्टपणे आसुरीसंपदेचा आहे हे उघड दिसते त्यामुळे त्या हितात असत्य (परमेश्र्वर नाही) आहे म्हणून ते सत्याचे (परमेश्र्वराशी) अहित ठरते म्हणून त्यज्य ठरते. त्या स्त्रीचा उद्देश स्पष्टपणे दैवीसंपदेशी निगडीत आहे म्हणून तिचे हित सत्याचे (परमेश्र्वराशी) ठरते व म्हणून योग्य ठरते.
ह्या उदाहरणात दोन पापकृत्ये पर्यायी असल्याचे दिसते, एक पर्याय त्या स्त्रीच्या हिता विरुद्ध वागल्याने होणारे जास्त वाईट पाप व दुसरे त्या धटिंगणांना खोटी माहिती देऊन होणारे कमी वाईट पाप. ह्या दोन पापकृत्यात कोणते जास्त वाईट ते पहावे लागेल. जेव्हां दोन पापांतून निवड करण्याची वेळ येते तेव्हां कमी वाईट पाप करावे व जास्त वाईट पाप टाळावयाचे असते.

अशारितीने सत्य-असत्य, हित-अहित, पाप व पुण्य ह्यांचे परस्पर संबंध कसे असतात हे लक्षात येते. जो हिंदू हे ओळखून ह्याची निवड करून आपली वर्तणूक ठरवतो तो नेहमी पुण्यवान राहिल असे समजले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात हे ठरवण्याचे अनेक प्रसंग उद्भवत असतात. त्याकरता ह्याची चर्चा येथे केली आहे.
५८. शेवटी वास्तविक सत्य व अध्यात्मातील सत्य ह्यातील फरक समजून घ्यावा लागेल. वरील उदाहरणांत आपण अध्यात्मातील सत्य काय ते पाहिले आहे. जीवनात वास्तविक सत्यापेक्षा अध्यात्मातील सत्य जास्त महत्वाचे आहे असे हिंदू विचार सांगतो. असे असले तरी, वास्तविक सत्याचे काय महत्व जीवनात आहे ते सुद्धा पहावे लागेल. न्यायालयात साक्ष देतांना काय बोलावे असा प्रश्र्न उपस्थित होतो. कांहीं सांगतील तेथेसुद्धा अध्यात्मातील सत्यच सांगावे परंतु, न्यायालय मात्र तेथे वास्तविक सत्याची अपेक्षा करीत असते. कारण, तेथे हित कोणाचे पहावयाचे, पाप कोणाला लागणार, अध्यात्मातील सत्य व वास्तविक सत्य ह्यांतील तडजोड कशी करावयाची हे सर्व ठरविणे निरनिराळ्या परिस्थितीवर अवलंबून असते. आपली न्याय व्यवस्था वास्तविक सत्यावर निर्धारीत असावी कीं, अध्यात्मातील सत्यावर असावी हे धोरण शासनाला ठरवावे लागेल. सांप्रत जी न्याय व्यवस्था आपल्याकडे अमलात आहे ती पापपुण्यावर आधारीत नाही, ती कायद्यांवर आधारीत आहे. कायद्यातील योग्य व अयोग्य ह्यांचा संबंध पापपुण्याशी नसतो. म्हणून जे कायदेशीर आहे ते पुण्यकारक असेलच असें नाही व जे बेकायदेशीर आहे ते पापकारक असेलच असे नाही. असें असल्यामुळे, व्यावहारीक जगात आणखीन एक सत्य ढवळाढवळ करतांना आढळते, त्याला आर्थिक सत्य म्हणूया. पैसे देऊन सत्य बदलण्याचे प्रकार सदोदित होत असतात ते एक विशेष सत्य न्यायालयात आढळते. त्यामुळे हा मुद्दा विवाद्य असून त्यावर चर्चा करणे ह्या लिखाणाच्या आवाक्या बाहेरचे आहे म्हणून, ह्या ठिकाणी मला तरी जास्त लिहीण्याची आवश्यकता वाटत नाही. बर्याच प्रसंगी न्यायालयातील सत्य अध्यात्मिक दृष्ट्या असत्य असले तरी ते माणसाला स्वीकारावे लागते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, सत्य व असत्य ह्यांचा संबंध समाजातील भ्रष्टाचाराशी असल्याचे दिसते. बर्याच निवाड्यात न्यायलयाने वास्तविक सत्य ग्राह्य धरल्यामुळे अध्यात्मिक अन्याय होतो असें दिसते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ३१ -
तांबे, सोने, चांदी ह्यांचा उपयोग चलनात नेहमी होत असतो, त्यासाठी त्यांची परिमाणे आता सांगतो. १३१
जाळीच्या पडद्यातून सूर्यकिरण येतात त्यांचे सुक्ष्म बिंदू हवेच्या कणांवर परावर्तित होतांना दिसतात ते सर्वात लहान असतात असें समजून ते सर्वात सुक्ष्म मुल्य समजावे. त्याला त्रसारेणू (धुळीकण) असें समजावे. १३२
आठ त्रसारेणू हे एक लिखा (ऊचे अंडे) एवढे समजावे, अशा तीन लिखा बरोबर एक बीज (काळ्या मोहरीचे बी) रगसर्शप असें समजावे, तीन रगसर्शपांचा एक पांढर्या मोहरीचे बी समजावे. १३३
सहा पांढर्या मोहरीच्या बी बरोबर जवाचे बी असें समजावे, तीन जवाच्या बी बरोबर एक गुजा (क्रिशला) समजावे. पांच गुंजा बरोबर मांसा (वटाण्याचे बी) समजावे. अशा सोळा मांसांचे एक सुवर्ण्य मुल्य धरावे. १३४
चार सुवर्णांचा एक पल, दहा पलांचा एक धर्न, दोन क्रिशलांचे (चांदीच्या) एक मशक (चांदीच्या) असें समजावे. १३५
सोळा माशकाचे धर्न किंवा पुरन समजावे. आणि एक गोष्ट लक्षात असू द्यावी कीं, एक कर्श तांब्याचा असेल तर त्याला कर्शपना किंवा पना समजावे. १३६
दहा धर्नांचा (चांदीच्या) एक सत्मण बनतो, चार सुवर्णांचा एक निष्क असतो हे ध्यानात ठेवावे. १३७
दोनशे पन्नास पनांचे पहिले सर्वात लहान माप अमर्समण असते. त्याचे पांचशे म्हणजे मधील अमर्समण व एक हजार असल्यास वरील अमर्समण समजावे. १३८
कर्जफेड न केल्याची कबुली दिल्यास त्याला पांचशे मुद्रा दंड करावा पण नाकारल्यास आणि ते सिद्ध झाले तर दुप्पट दंड करावा. १३९
सावकार आपल्या कर्जाचे व्याज स्वतः ठरवू शकतो. त्याच्या मुद्दलाच्या ते (कमाल), महिना अठरावा भाग शंभर भागांचा, (अठरा टक्के) असें वशिष्ठाने सुचविले आहे. १४०
परंतु, मनु सांगतो किं, चांगल्या माणसांसाठी तो व्याजाचा दर महिना दोन टक्का असावा. असा धेतल्याने तो (सावकार) पापी ठरत नाही. १४१
वर्णानुसार तो व्याजाचा दर दोन, तीन, चार आणि पांच असा असावा. १४२ टीपः ब्राह्मणांस दोन व शुद्रास पांच असे सुचवले आहे.
गहाण पत्र चांगले असेल तर तो सावकार बिनव्याज कर्ज देऊ शकतो व कालांतराने तो गहाण विकून कर्ज वसूल करू शकतो. १४३
सावकाराने ठेवलेली वस्तु वापराता कामा नये, जर त्यांने ती वापरली तर त्याची चोरी त्यांने केली असा अर्थ लावला जाईल. किंवा त्या वस्तुची रास्त किंमत सावकाराला ऋणकोस द्यावी लागते. त्याशिवाय कर्ज माफ होईल. १४४
काळ कितीही गेला तरी गहाणवट अथवा रक्कम संपली असें धरता येत नाही. त्याची वसुली सावकाराकडून करता येईल. १४५
मित्रत्वाच्या नात्याने जर ती गहाणवट (गाय, उंट, घोचा, इतर पशु) वापरली गेली तर ती मालकाला परत करावी लागेल. १४६
परंतु, जर असा वापर होत असतांना मालकांने त्यास आक्षेप गेतला नाही तर त्या (गहाण) मालकांस परत मांगता येणार नाही. १४७ टीपः मालकांने (ऋणकोने) आक्षेप घेऊन त्याचा हक्क दाखवायचा असतो.
जर मालक (ऋणको) मूर्ख (वयाने लहान) अथवा वेडा नसेल तर वरील नियम लागू होतो. मालक मूर्ख असेल तर वरील नियम लागू होत नाही. वापरणार्याला त्या चीजा परत कराव्या लागतील. १४८
गहाणपत्र, सीमा, लहान मुलाची मालमत्ता, व्याजू लावलेली रक्कम, बंद लखोटा, बाई, राजाची मालमत्ता आणि श्रोत्रीय ह्यांची मालमत्ता इतराने कितीही वापरली तरी त्याची मालकी त्यांना होत नाही. १४९
जर सावकाराने मूर्खपणाने ऋणकोची चीजवस्तु त्याच्या परवानगा शिवाय वापरली तर त्याने आक्षेप घेतल्यास त्याला (ऋणकोला) भरपाई म्हणून अर्धे व्याज माफ करावे लागेल. १५० टीपः सावकाराकडे ठेवलेली गहाणवट सुरक्षित आहे कीं नाही ते तपासण्याचा अधिकार ऋणकोला असतो.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी